बिहारमधे राजकीय वातावरणात बदल झाल्यानंतर आज नव्या सरकार स्थापन होणार आहे. नितिश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत आरजेडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर देशातील राजकीय वर्तळातुन वेगवेगळ्या प्रतिक्रीया यायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या या निर्णयावरू यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी नितीश कुमारांचं (Nitish Kumar) कौतुक केलं आहे.
बिहारमधील राजकीय स्थित्यंतरानंतर अंबादास दानवे यांनी नितीश कुमारांचं कौतुक केलं. ते म्हणाले, आपल्या भागातील एका दैनिकाचं छान ब्रीदवाक्य आहे. शेळी म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा, सिंह म्हणून एक दिवस जगणं सार्थकी लागतं.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाटत असेल, की आपण शेळी म्हणून जगत आहोत, तर त्यांनी एक दिवस सिंह म्हणून जगण्याचा स्वाभिमानाचा निर्णय घेतला असावा… तो योग्यच आहे, असं वक्तव्य दानवेंनी केलंय. भाजपाच्या दबावापुढे न झुकता एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा अत्यंत स्वाभिमानाचा निर्णय आहे. भाजपाच्या या दमननीतीचा एक दिवस भारतात विस्फोट होईल, असा इशारादेखील अंबादास दानवे यांनी दिला.
[read_also content=”‘या’ कारणामुळे कांजूरमार्ग मेट्रो कारशेड संबधी याचिका विकासकाने घेतली मागे https://www.navarashtra.com/maharashtra/due-to-some-reason-the-developer-withdrew-the-petition-regarding-kanjurmarg-metro-carshed-nrps-314223.html”]