पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज, १२ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी असल्याने, अमित शाह हे रायगड किल्ल्यावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणार आहेत. या दौऱ्यासाठी ते कालच पुण्यात दाखल झाले असून, त्यांनी रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले आहेत. सकाळी दहा वाजता ते पुण्यातून रायगडकडे रवाना होतील किल्ले रायगडावर पोहोचून ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करणार आहेत. मात्र, त्याआधी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे.
रायगड दौर्याच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी अमित शाह यांना त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे अमित शाहांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही अमित शाह यांच्या या महाराष्ट्र दौर्यात केला जाण्याची शक्यता आहे.
रेल्वेचा दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक, प्रवाशांची रात्र स्टेशनवर
महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भातील वाद कायम आहे. कालच एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रीपदाबाबत लवकरच तोडगा निघेल, थोडा संयम ठेवा, असे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अमित शाह यांच्या उपस्थितीत या दोन्ही पालकमंत्रीपदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेत काही ठोस निर्णय होऊ शकतो, असे अनुमान व्यक्त केले जात आहे.
अमित शाह शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले असून त्यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. याच हॉटेलमध्ये रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या तिघांमध्ये पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
व्हिसाशिवाय पाकिस्तानी व्यक्ती आला भारतात! घेतला वडापावचा आस्वाद; असं कुणीही देशात येऊ शकतं का?
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, परंतु यावर एकनाथ शिंदे यांच्या गटानेही दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी आपली इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे हा वाद अधिक गडद झाला. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठीही शिंदे गटाने आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात या वादग्रस्त पालकमंत्रीपदांच्या वाटपावर निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.