local (फोटो सौजन्य- pinterest)
पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ३४४ लोकल सेवा रद्द झाल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला आहे. शुक्रवार रात्रीपासून सुरु झालेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना रात्र स्टेशनवर काढावी लागली. तसेच सकाळी रेल्वे स्थानकावर आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. मेगा ब्लॉकमुळे अंधेरी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली.
एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो प्रवास, महिन्याभरात मुंबई वन कार्ड सेवेत
विरारवरुन फक्त अंधेरीपर्यंत लोकल
विरारवरुन सकाळच्या वेळेत सर्वच लोकल अंधेरीपर्यंत सोडण्यात आल्या. अंधेरीच्या पुढे मेगाब्लॉक सुरू असल्याने सर्व लोकल बंद होत्या. या मेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका बसला. रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणतीही सुविधा दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत होता. रात्री आलेल्या प्रवाशांना जेवण मिळाले नसल्याने प्लॅटफॉर्मवर उपाशीच झोपावे लागले.
मेगाब्लॉक का घेण्यात आला?
पश्चिम रेल्वेने दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. माहीम ते बांद्रा स्तनाकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे शुक्रवारी अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:०० ते सकाळी ८:३० पर्यंत गाड्या धावल्या नाहीत. अप डाऊन जलद मार्गावर रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत लोकल सेवा बंद होती. यावेळी चर्चगेट स्थानकातून रात्री १०:२३ सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
आज शनिवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक होता. अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत लोकल सेवा बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये पोहोचणे अवघड झाले आहे. अप जलद मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ८:०० वाजपर्यंत लोकल सेवा बंद होती. या काळात चर्चगेट, दादर दरम्यान जलद लोकल बंद होत्या. तसेच डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.