Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: १४० बालके अतितीव्र कुपोषित! मेळघाटातील वास्तव; धारणी-चिखलदऱ्यात २,२९१ बालके आढळले

Amravati News: धारणी तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या १ हजार ४७५ इतकी आहे. चिखलदरा तालुक्यातही परिस्थिती फारशी वेगळी नसून येथे तपासणी करण्यात आलेल्या ९ हजार ६६९ बालकांपैकी ८ हजार ९४७बालके सर्वसाधारण वजन व उंचीची आढळली.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 06, 2026 | 11:55 AM
१४० बालके अतितीव्र कुपोषित! मेळघाटातील वास्तव; धारणी-चिखलदऱ्यात २,२९१ बालके आढळले

१४० बालके अतितीव्र कुपोषित! मेळघाटातील वास्तव; धारणी-चिखलदऱ्यात २,२९१ बालके आढळले

Follow Us
Follow Us:

Amravati News: मेळघाटातील कुपोषणाचे विदारक वास्तव पुन्हा एकदा आकडेवारीतून समोर आले. धारणी आणि चिखलदरा आदिवासीबहुल तालुक्यांतील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य या तपासणीत २१ हजार ८९५ बालके कुपोषित आढळली. यामध्ये १४० बालके अतितीव्र कुपोषित कमी वजनाची असल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीत झाली. त्यामुळे गतकाळातील आकडेवारीचा विचार करता मेळघाटातील बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा चांगला परिणाम दिसून येत आहे. धारणी तालुक्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील २१ हजार ८९५ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० हजार ४२० बालके उंचीची आढळली. मात्र १ हजार ३८० बालके मध्यम कमी वजनाची, तर ९५ बालके तीव्र कमी वजनाची असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.(फोटो सौजन्य – istock)

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

धारणी तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या १ हजार ४७५ इतकी आहे. चिखलदरा तालुक्यातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. येथे तपासणी करण्यात आलेल्या ९ हजार ६६९ बालकांपैकी ८ हजार ९४७बालके सर्वसाधारण वजन व उंचीची आढळली. तर ६७७ बालके मध्यम कमी वजनाची आणि ४५ बालके तीव्र कमी वजनाची असल्याचे समोर आले. या तालुक्यात कुपोषित बालकांची एकूण संख्या ७२२ आहे. धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्यांची आकडेवारी एकत्रित पाहता, हजारो बालकांना पोषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, त्यापैकी १४० बालकांची प्रकृती गंभीर श्रेणीत असल्याचे चित्र आहे.

कुपोषणाचे विदारक वास्तव

कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच पालकांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे. माता-पित्यांना घरच्या घरी बालकांना द्यावयाचा पौष्टिक आहार, स्वच्छतेच्या सवयी तसेच बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत माहिती दिली जात आहे. महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग आणि पालक यांनी एकत्रितपणे काम करून बालकांच्या आरोग्यात कायमस्वरुपी सुधारणा घडवून आणावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती डॉ. प्रवीण पारिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. अमरावती यांनी दिली आहे.

प्रत्येक बालक निरोगी आणि सुदृढ राहावे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. एमएएम आणि एसयूडब्ल्यू बालकांच्या पोषणस्थितीत सुधारणा करण्यासाठी व्हिसीडीसीच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. बालकांना पौष्टिक आहार, आवश्यक आरोग्य सेवा, नियमित देखरेखीचा लाभ मिळावा, यासाठी अंगणवाडी व आरोग्य विभागाचे कर्मचारी समन्वयाने कार्यरत आहेत. प्रत्येक बालकाच्या प्रगतीचा नियमित आढावा आहे, अशी माहिती – ऋषिकेश लोटन पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

संख्या कमी होत असल्याचे चित्र:

दरम्यान, यापूर्वीच्या सरकारी आकडेवारीनुसार। मेळघाटात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. २०२० मध्ये ४५६ असलेली अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या २०२२ मध्ये २१३ आणि मे २०२३ मध्ये २०५ पर्यंत खाली आली होती आणि आता जूनमध्ये ही संख्या १४० पर्यंत आली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news 140 children severely malnourished the reality in melghat 2 291 such children found in dharni and chikhaldara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news

संबंधित बातम्या

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी
1

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध
2

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत
3

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित
4

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.