Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: ६५ शाळांत स्वच्छतागृह धूळखात! निकृष्ट साहित्यामुळे दर्जावर प्रश्नचिन्ह; अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी

Amravati News: काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली असली, तरी त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छता गृहांसाठी वापरण्यात आलेल्या पापला तडे जाणे, टाइल्स व फरशा फुटणे, अन्य साहित्याची गुणवत्ता समाधानकारक नसणे, अशा तक्रारी समोर आल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2026 | 03:25 PM
६५ शाळांत स्वच्छतागृह धूळखात! निकृष्ट साहित्यामुळे दर्जावर प्रश्नचिन्ह; अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी

६५ शाळांत स्वच्छतागृह धूळखात! निकृष्ट साहित्यामुळे दर्जावर प्रश्नचिन्ह; अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

Amravati News: पावर्धा प्रथाल्दा ६५ शाळांसाठी पुरविण्यात आलेले प्री-फॅब्रिकेटेड सॅनिटरी फॅसिलिटी (स्वच्छतागृह) कंटेनर अनेक महिन्यांपासून शाळांमध्ये बसविण्यात आलेले नाही. काही शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या कंटेनरमधील साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे दर्जेदार साहित्याचा वापर करीत अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या

निकृष्ट साहित्यामुळे गुणवत्तेवर प्रश्न

काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली असली, तरी त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छता गृहांसाठी वापरण्यात आलेल्या पापला तडे जाणे, टाइल्स व फरशा फुटणे, अन्य साहित्याची गुणवत्ता समाधानकारक नसणे, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक शाळांमध्ये कंटेनर बसविण्याचे काम अपूर्ण असल्याने ते शालेय परिसरात पडून आहे.

वर्क ऑर्डरनुसार काम पूर्ण करण्याची मागणी

कामाच्या वर्क ऑर्डरमध्ये नमूद केल्यानुसार प्री-फॅब्रिकेटेड सॅनिटरी फॅसिलिटीचे संपूर्ण इन्स्टॉलेशन अभिलेख पूर्ण करावेत. वर्क ऑर्डरमध्ये निर्धारित केलेल्या दर्जाचे व उपयुक्त साहित्य वापरून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या माध्यमातून शाळांमधील बालकांसाठी स्वच्छतागृहांची खरेदी करून ती शाळांमध्ये बसविण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. या कामाचे कंत्राट नाशिक येथील पवार पाटकर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. संबंधित कंपनीमार्फत जिल्ह्यातील शाळांसाठी हे कंटेनर पुरविण्यात आले. काही शाळांमध्ये मार्चमध्ये, तर काही ठिकाणी मे व जुलै महिन्यात कंटेनर पाठविण्यात आले. अद्यापही अनेक शाळांमध्ये त्यांची उभारणी करण्यात आलेली नाही. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सीमा पाटील यांना निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देताना कामाचा दर्जा आणि सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. तक्रारीची दखल घेऊन संबंधित यंत्रणा अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आणि साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणती कार्यवाही करते. याकडे लक्ष लागले आहे. असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news toilets in 65 schools lie unused poor quality raises concerns sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Amaravati
  • Maharashtra Schools
  • trending

संबंधित बातम्या

Amravati News: अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या
1

Amravati News: अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका
2

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट
3

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर
4

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.