
फ्लाईंग अकॅडमीला मान्यता!देशातील सर्वात मोठ्या प्रशिक्षणासाठी ३४ विमाने सज्ज; पहिल्या तुकडीत १८० प्रशिक्षणार्थी
Amravati News: देशातील विमान वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि विदर्भाच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणारा अमरावतीतील एअर इंडिया फ्लाइंग अकादमीचा (एफटीओ) प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बेलोरा विमानतळावर आकार घेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले. वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व ३४ विमाने विमानतळावर दाखल झाली आहेत.(फोटो सौजन्य – AI)
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येणारे हे केंद्र दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. या अकादमीमुळे देशातील भावी वैमानिकांना महाराष्ट्रातच जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रशासकीय आणि परिचालनविषयक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या महिनाभरात प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिल्या तुकडीत एकूण १८० प्रशिक्षणार्थीचा समावेश केला जाणार आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व विमाने बेलोरा विमानतळावर दाखल झालीआहेत. यामध्ये ३१ सिंगल इंजिन ‘पायपर आर्चर’ आणि तीन ट्विन इंजिन ‘डायमंड डीए ४२ एनजी’ अशा एकूण ३४ आधुनिक विमानांचा समावेश आहे. याला आता डीजीसीएने अधिकृत मान्यता दिल्यानंतर आता प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
व्यावसायिक वैमानिक परवाना (कमर्शियल पायलट लायसन्स) मिळविण्यासाठीचा अभ्यासक्रम १८ महिन्यांचा असेल. या कालावधीत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रत्यक्ष विमानातून २०० तासांचे उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. यामध्ये सिंगल इंजिन १५ विमानातून १८५ तास, तर मल्टिइंजिन विमानातून तासांचे उड्डाण प्रशिक्षण दिले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, अमरावतीतील अनुकूल हवामानामुळे वर्षातील किमान ३०० दिवस उड्डाण प्रशिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी अमरावती हे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे.
प्रशिक्षण केंद्राचा परिसर १० एकर क्षेत्रात विस्तारलेला आहे. येथे प्रशिक्षणार्थीसाठी वसतिगृह, भोजनगृह, अत्याधुनिक वर्गखोल्या, ब्रिफिंग रूम, हँगर तसेच विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी सराव करण्यासाठी तीन फ्लाइट सिम्युलेटरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये दोन सिंगल इंजिन आणि एका मल्टिइंजिन सिम्युलेटरचा समावेश आहे. प्रशिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी प्रत्येक फ्लाइट इन्स्ट्रक्टरकडे केवळ सहा प्रशिक्षणार्थी असतील, असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
Ans: होय. अमरावतीतील फ्लाईंग अकॅडमीला मान्यता मिळाल्यामुळे विमान प्रशिक्षण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Ans: या अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी एकूण ३४ विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Ans: पहिल्या तुकडीत १८० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.