Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार: मुख्यमंत्री फडणवीस

CM Devendra Fadnavis: या स्मारकामध्ये मुख्य स्मारकासोबत शहानूर नदीवरील पूल, २.४० किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता, संत रूपलालजी महाराजांचा पुतळा आणि अन्य पुतळ्यांची उभारणीही आराखड्यात समाविष्ट आहे. या कामांमुळे स्मारकापर्यंत पोहोचणे सुलभ होऊन परिसरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 02:35 AM
Sant Shiromani Maharaj Smarak

Sant Shiromani Maharaj Smarak

Follow Us
Follow Us:
  • श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार- फडणवीस 
  • ८० कोटी २६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला गती
  • धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनासह स्थानिक रोजगाराला चालना देण्यात येणार 
मुंबई/CM Devendra Fadnavis: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून, सुमारे ८० कोटी २६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार जतन होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थान येथे जिल्हा अमरावती मधील अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीत विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी आमदार संजय कुटे,आमदार गजानन लवाटे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव वित्त विकासचंद्र रस्तोगी, अपर मुख्य सचिव महसूल विकास खारगे, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मिलींद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव,ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमरावती आशिष येरेकर यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंजनगाव सुर्जी येथे मौजे जेठमलपूरमध्ये हे राष्ट्रीय स्मारक आकार घेणार आहे. या स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करावा. संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या संत रूपलालजी महाराज यांनी समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.

विकास आराखड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व निवासी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, चंद्रभागा इमारत, प्रवचन सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, निवासी खोल्या, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. या सुविधांमुळे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, पोथीवाचन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासासह अन्य आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत.

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

या स्मारकामध्ये मुख्य स्मारकासोबत शहानूर नदीवरील पूल, २.४० किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता, संत रूपलालजी महाराजांचा पुतळा आणि अन्य पुतळ्यांची उभारणीही आराखड्यात समाविष्ट आहे. या कामांमुळे स्मारकापर्यंत पोहोचणे सुलभ होऊन परिसरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. हे राष्ट्रीय स्मारक धार्मिक श्रद्धेसह सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री फडणवीस यांनी कशा संदर्भात बैठक घेतली?

    Ans: अमरावती मधील अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली.

  • Que: किती रूपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली?

    Ans: श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सुमारे ८० कोटी २६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

Web Title: Cm devendra fadnavis approval to fund for bult sant shri shiromani maharaj smarak in amravati tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati News
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
1

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!
2

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

Amravati News: शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक विजयी; मिळाली ११,४८१ मते
3

Amravati News: शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक विजयी; मिळाली ११,४८१ मते

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब
4

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.