अमरावतीत फ्लॅट खरेदी करताना सावधान! मंजूर नकाशापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध
Amravati News: अमरावतीत फ्लॅट किंवा सदनिका खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामे आणि मंजूर नकाशापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या सदनिकांची विक्री रोखण्यासाठी शासनाने दस्तनोंदणीची प्रक्रिया अधिक कडक केली. महसूल विभागाने १२ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सदनिकेच्या दस्तनोंदणीपूर्वी आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून, कागदपत्रांचा अभाव किंवा मंजूर नकाशाशी विसंगती आढळल्यास नोंदणी नाकारली जाऊ शकते.(फोटो सौजन्य – AI)
अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा; आता इंदूर सेवेसाठी तीन कंपन्यांशी पत्रव्यवहार
अनेकदा बिल्डरकडून सांगितलेले क्षेत्रफळ आणि मंजूर बांधकाम नकाशातील क्षेत्रफळ याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. त्यामुळे केवळ बिल्डरने दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता सदनिकेचे मंजूर क्षेत्रफळ, बांधकाम परवानगी आणि संबंधित प्रमाणपत्रांची खातरजमा करणे महत्त्वाचे ठरणार आहे. रेरा नोंदणी आवश्यक असलेल्या प्रकल्पांसाठी रेरा नोंदणी प्रमाणपत्र किंवा भोगवटा प्रमाणपत्र, तसेच सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद असलेला मंजूर बांधकाम नकाशा आवश्यक राहणार आहे. रेरा लागू नसलेल्या प्रकल्पांसाठी बांधकाम परवानगी किंवा प्रारंभ प्रमाणपत्र, मंजूर बांधकाम नकाशा, झोन दाखला आणि मोजणी नकाशा सादर करावा लागणार आहे. घर खरेदी करताना केवळ किंमत आणि क्षेत्रफळ पाहून निर्णय घेऊ नका. कागदपत्रांची पडताळणी करूनच व्यवहार करा, अन्यथा पुढे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिकेच्या विक्रीकराराची, खरेदीखताची, अपार्टमेंट डीडची किंवा हस्तांतरणपत्राची नोंदणी करताना संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्यास किंवा दस्तातील क्षेत्रफळ मंजूर नकाशाशी विसंगत असल्यास नोंदणी केली जाणार नाही, असे परिपत्रकात नमूद आहे. नियमांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकामाशी संबंधित दस्तांची जाणीवपूर्वक नोंदणी केल्यास संबंधित दुय्यम निबंधकाविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती
मंजूर बांधकाम नकाशा: सदनिकेचे अधिकृत क्षेत्रफळ.
बांधकाम पर्वानगी: प्रकल्पाला आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत का, याची खात्री करा.
रेरा नोंदणी: प्रकल्पाला रेरा नोंदणी लागू असल्यास त्याची स्थिती.
आवश्यक प्रमाणपत्रे : भोगवटा प्रमाणपत्रासह लागू असलेली संबंधित कागदपत्रे.
Ans: फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी मंजूर बांधकाम नकाशा, सदनिकेचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ, बांधकाम परवानगी, मालकी हक्काची कागदपत्रे आणि MahaRERA नोंदणी लागू असल्यास तिची पडताळणी करावी.
Ans: याचे उत्तर संबंधित नियम, मंजुरी आणि बांधकामाची कायदेशीर स्थिती यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकरणात नोंदणी होईलच किंवा होणारच नाही, असे सरसकट सांगता येत नाही. अमरावतीतील लागू आदेशाची अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे.
Ans: विक्री करार आणि मंजूर नकाशातील तपशील तपासून बिल्डरकडून लेखी स्पष्टीकरण मागावे. गरज पडल्यास वकिलाचा सल्ला घ्यावा किंवा लागू परिस्थितीनुसार MahaRERA अथवा संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करावी.






