Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा

Amravati News: विश्वास ठेवून पैसे पाठवू पाठवू नयेत. कोणत्याही गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित संस्था आणि योजनेची सत्यता तपासणे आवश्यक आहे. तसेच पैशांच्या आमिषाने कोणालाही स्वतःचे बैंक खाते वापरण्यास देऊ नये. संशयास्पद व्यवहार किंवा ऑनलाइन फसवणूक लक्षात येताच तातडीने पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2026 | 11:09 AM
साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा

साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा

Follow Us
Follow Us:

Amravati News: शेअर बाजारात गुंतवणूक करून कमी कालावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी अमरावतीकरां ना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. २०२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली झालेली फसवणूक ९ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, २०२६ च्या पहिल्या ९ महिन्यांत शहरात सायबर फसवणुकीचे ३२ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये नागरिकांचे ३ कोटी ५३ लाख ४६ हजार ९०३ रुपये लुटण्यात आले आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी यापैकी १ कोटी १९ लाख ७० हजार ९२९ रुपये गोठवून संभाव्य नुकसान कमी करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती सायबर विभागप्रमुख सतीश पाटील यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

अश्लील साहित्य, सोशल मीडियाशी संबंधित गुन्हेही:

चालू वर्षात सायबर फसवणुकीच्या ३२ गुन्ह्यांसोबतच अश्लील साहित्याशी संबंधित ३. तर समाजमाध्यमांशी संबंधित ३ गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजीटल अरेस्टच्या प्रकारातही वाढः

शहरासह ग्रामीण भागात डिजीटल अरेस्ट आणि ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त अधिकाऱ्यांना लक्ष्य करून लाखो रुपयांची लूट केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये शंकरनगर येथील निवृत्त बँक व्यवस्थापकाला आधार कार्डचा दहशतवादी कारवायांमध्ये गैरवापर झाल्याची खोटी भीती व्हिडीओ कॉलद्वारे दाखवून ८० लाख ८० हजार रुपयांना फसविण्यात आले. अमरावती सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासातून ४० लाख रुपये गोठवून परत मिळवून दिले. ऑगस्टमध्ये वृद्ध दाम्पत्याला मनी लॉड्रिंगच्या खोट्या आरोपाखाली डिजीटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न झाला; मात्र जावयाच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली. यापूर्वी एका निवृत्त न्यायाधीशांची ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब

३ वर्षांत फसवणुकीचा आकडा वाढला

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२३ पासून या प्रकारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.सायबर ठग फसवणुकीतून मिळालेली रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न ठेवता दुसऱ्यांच्या बैंक खात्यांमधून फिरवतात. यासाठी खातेदारांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती वापरली जातात. अशा खात्यांमुळे फसवणुकीतील पैशांचा माग काढणे कठीण होऊ शकते. या प्रकाराशी संबंधित ३ गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Amravati news fraud worth 9 crore rupees over three and a half years 32 complaints filed in 9 months sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Amaravati
  • Bank Fraud
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी
1

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश
2

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

Amravati News: अमरावतीत फ्लॅट खरेदी करताना सावधान! मंजूर नकाशापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध
3

Amravati News: अमरावतीत फ्लॅट खरेदी करताना सावधान! मंजूर नकाशापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.