Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

Amravati News: वरिष्ठ स्तरावर मांडण्यासाठी शिक्षण विभागाच्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा घडवून आणावी, अशी मागणीही करण्यात आली. एसएनए स्पर्श प्रणाली अधिक सुलभ करणे, सर्व्हरचा वेग वाढविणे, ओटीपीची मुदत वाढविणे आणि अनुदान खर्चासाठी दिलेला कालावधी वाढविणे आवश्यक असल्याचे शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 29, 2026 | 11:36 AM
एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

Follow Us
Follow Us:

Amravati News: जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मिळणाऱ्या विविध अनुदानांच्या खर्चासाठी लागू करण्यात आलेल्या एसएनए स्पर्श प्रणालीमुळे मुख्याध्यापकांना तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे.संथ सव्र्व्हर, ऑनलाइन प्रक्रियेतील किचकटपणा आणि ओटीपीसाठी मिळणारी अवघ्या एका मिनिटाची मुदत यामुळे मुख्याध्यापकांचा अध्यापनासह शालेय कामकाजाचा वेळ खर्च होत आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करून अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दरवर्षी शाळा अनुदान, बांधकाम अनुदान, शालेय गणवेश अनुदान तसेच बूट व मोजे खरेदीसाठी विविध अनुदाने दिली जातात. यापूर्वी या अनुदानांच्या खर्चाची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावरून पूर्ण केली जात होती. मात्र, यंदा एसएनए स्पर्श प्रणालीद्वारे मुख्याध्यापकांनाच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. या प्रक्रियेत दुकानदारांकडून देयके घेणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा आदेश प्राप्त करणे आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर अध्यक्ष, दुकानदार आणि मुख्याध्यापक यांच्या आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकांवर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून देयक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर संबंधित दुकानदाराच्या खात्यात रक्कम जमा होते.

ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या, सव्र्व्हरची संथ गती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी वेळेत संपर्क साधण्यात येणाऱ्या अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे कठीण होत आहे. ओटीपीसाठी अवघा एक मिनिटाचा कालावधी मिळत असल्याने अध्यक्ष वेळेत उपलब्ध न झाल्यास व्यवहाराची प्रक्रिया पुन्हा करावी लागते. परिणामी, मुख्याध्यापकांचा वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होत आहेत. विशेष म्हणजे, ठरवून दिलेल्या मुदतीत अनुदान खर्चाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने मुख्याध्यापकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

समस्या वरिष्ठ स्तरावर मांडण्याची मागणी

या अडचणींबाबत मुख्याध्यापकांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समग्र शिक्षा अभियानाच्या लेखाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि प्रत्यक्ष कामकाजात येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. या समस्या वरिष्ठ स्तरावर मांडण्यासाठी शिक्षण विभागाच्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा घडवून आणावी, अशी मागणीही करण्यात आली. एसएनए स्पर्श प्रणाली अधिक सुलभ करणे, सर्व्हरचा वेग वाढविणे, ओटीपीची मुदत वाढविणे आणि अनुदान खर्चासाठी दिलेला कालावधी वाढविणे आवश्यक असल्याचे शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Amravati News: ६५ शाळांत स्वच्छतागृह धूळखात! निकृष्ट साहित्यामुळे दर्जावर प्रश्नचिन्ह; अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी

SNA SNA स्पर्श शक्य असल्यास पूर्वीप्रमाणेच अनुदान खर्चाची जबाबदारी गट साधन केंद्रांकडे सोपवावी, अशी मागणीही समितीने केली आहे. तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून मुख्याध्यापकांना दिलासा द्यावा आणि त्यांना अध्यापन व शैक्षणिक कामकाजासाठी अधिक वेळ उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा शिक्षक समितीने व्यक्त केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati headmasters face grant spending hurdles teachers committee seeks changes to sna sparsh system sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • Maharashtra Schools

संबंधित बातम्या

राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश
1

राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश
2

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

Amravati News: अमरावतीत फ्लॅट खरेदी करताना सावधान! मंजूर नकाशापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध
3

Amravati News: अमरावतीत फ्लॅट खरेदी करताना सावधान! मंजूर नकाशापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध

Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती
4

Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.