Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

Amravati News: खरीप हंगामातील नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बीच्या पेरणीवर खर्च करण्यापूर्वी पाण्याची खात्री हवी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2026 | 01:44 PM
अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

Follow Us
Follow Us:

Amravati News: यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामातील पिके कशी जगवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. गहू आणि हरभऱ्याच्या पेरणीचा हंगाम जवळ येत असताना चांदूर रेल्वे शहरासह परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त असलेल्या मालखेड तलावात यंदा केवळ ८१.२३ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रब्बी पिकांसाठी सिंचनाचे पाणी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता! सोयाबीन काढणीला लगबग, पावसाच्या धास्तीने धावपळ वाढली

गहू-हरभरा पेरणीपूर्वी शेतकरी अडचणीत

पेरणी करावी की नाही, शेतकरी संभ्रमात मालखेड तलावातून चांदूर भाग क्रमांक एक, मांजरखेड, बासलापूर, धानोरा म्हाळी, शिवणी यासह परिसरातील शेतीला दरवर्षी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी चार दिले जाते. यासाठी तलावातून लघु वितरिकांद्वारे पाणी सोडले जाते. मात्र, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नसल्यास उपलब्ध जलसाठ्यानुसार दोन किंवा तीन वितरिकांद्वारे सिंचनाची व्यवस्था केली जाते. यंदा मर्यादित जलसाठ्यामुळे सिंचनाचे नियोजन अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.

शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवल्यानंतर शेतीसाठी किती पाणी उपलब्ध होईल, किती वितरिका सुरू होतील आणि किती क्षेत्राला त्याचा लाभमिळेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. खरीप हंगामातील नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बीच्या पेरणीवर खर्च करण्यापूर्वी पाण्याची खात्री हवी आहे. पेरणी, बियाणे आणि खतांवर खर्च केल्यानंतर सिंचनासाठी पाणी मिळाले नाही, तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती शेतकरी व्यक्त केली.

पिण्याचे पाणी आणि सिंचन साधण्याचे आव्हान

एकीकडे शहराची पिण्याच्या पाण्याची गरज, तर दुसरीकडे रब्बी पिकांसाठी सिंचनाची मागणी, अशा दुहेरी आव्हानाला प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी पिकांवर आहेत. मात्र, सिंचनाच्या पाण्याची अनिश्चितता कायम राहिल्यास पेरणीचे क्षेत्र आणि संभाव्य उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या आगामी निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अकोला जिल्ह्यात 42 अतिरिक्त, तरी 15 शाळा एकशिक्षकी; अनेक शाळांची अवस्था तशीच…

८८ रथी पिकांसाठी मालखेड तलावातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मात्र, जलसाठा कमी असल्याने शेतकऱ्यांची मागणी प्राप्त झाल्यानंतरच पाणी सोडण्याचे नियोजन करता येईल. लवकरच पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन पुढील व्यवस्था निश्चित केली जाईल. दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत, अशी माहिती – विनय मुन्ने, उपविभागीय अधिकारी, सिंचन विभाग यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामावर काय परिणाम होतो?

    Ans: अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

  • Que: रब्बी हंगामात कोणती प्रमुख पिके घेतली जातात?

    Ans: रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी आणि करडई यांसारखी पिके घेतली जातात.

  • Que: रब्बी पिकांची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

    Ans: शेतातील ओलावा तपासावा, स्थानिक कृषी विभागाचा सल्ला घ्यावा आणि संबंधित पिकासाठी शिफारस केलेली पेरणीची वेळ व पद्धत यांचे पालन करावे.

Web Title: Amravati news poor rainfall threatens rabi season farmers face crisis before wheat and gram sowing sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Amaravati
  • drought news
  • farmer

संबंधित बातम्या

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका
1

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
2

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण
3

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर
4

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.