
सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर
Amravati News: नापिकीच्या संकटाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची अमरावती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. १ ऑक्टोबरला सोयाबीनची आवक शून्य असताना ९ ऑक्टोबरला ती ९ हजार ३३ पोत्यांवर पोहोचली. त्यानंतर १२ ऑक्टोबरला तब्बल १५ हजार ७५७पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. १३ ऑक्टोबरला आवक काहीशी कमी होऊन १२ हजार २४ पोत्यांवर आली. त्यामुळे १ ते १३ ऑक्टोबरदरम्यान सोयाबीनची आवकमध्ये झालेली वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार लक्षवेधी ठरले आहेत.(फोटो सौजन्य – istock)
Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
६,५५१ रुपयांवर १३ ऑक्टोबरला दर विशेष म्हणजे, सोमवारी बाजारात सर्व शेतमालाची एकूण आवक १७ हजार ३३५ पोती होती. त्यापैकी १५ हजार ७५७ पोती सोयाबीनची होती. मंगळवारी सर्व शेतमालाची एकूण आवक १३ हजार ३२६ पोती, तर सोयाबीनची आवक १२ हजार २४ पोती नोंदविण्यात आली. यावरून बाजारपेठेत नवीन सोयाबीनचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते.
गहू, हरभरा, तुरीचेही बाजारभाव चर्चेत; सोयाबीनव्यतिरिक्त इतर शेतमालाच्या बाजारभावातही चढ-उतार नोंदविण्यात आले. गव्हाच्या मिल प्रतीची सर्वाधिक आवक १ ऑक्टोबरला २०९ पोती होती. या दिवशी गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ६०० ते २ हजार ७०० रुपये भाव मिळाला. ३ ऑक्टोबरला कमाल भाव २ हजार ७५० रुपयांवर पोहोचला, तर ९ ऑक्टोबरला आवक ८९ पोत्यांवर आली. गावरान हरभऱ्याची सर्वाधिक आवक ६ ऑक्टोबरला ७४८ पोती झाली. त्या दिवशी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये भाव मिळाला. ७ ऑक्टोबरला कमाल भाव ७ हजार ४५१ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी हरभऱ्याची आवक ३५८ पोत्यांवर आली. उपलब्ध आकडेवारीनुसार तुरीचा कमाल भाव प्रतिक्विंटल १० हजार ७०१ रुपये नोंदविण्यात आला. एकूणच, १ ते १३ ऑक्टोबरदरम्यान सोयाबीनच्या आवकेत झालेली मोठी वाढ बाजारपेठेतील बदलते चित्र स्पष्ट करते. मात्र, आवकेचा वाढता ओघ आणि दरातील चढ-उतार यांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती फायदा होतो, हे आगामी बाजारभावावर अवलंबून राहणार आहे.
सोयाबीनच्या आवकसोबतच बाजारभावातही चढ़-उतार दिसून आले. १ ऑक्टोबरला नवीन सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल ५ हजार ७५० ते ६ हजार २०० रुपये होता. शुक्रवारी तो ६ हजार ३०० ते ६ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला. या तुलनेत किमान भावात ५५० रुपये, तर कमाल भावात ६०० रुपयांची वाढ झाली. मात्र, सोमवारी किमान भाव ६ हजार १०० रुपये आणि कमाल भाव ६ हजार ५०३ रुपये होता. मंगळवारी किमान भाव ६ हजार १०० रुपये कायम राहिला, तर कमाल भाव ६ हजार ५५१ रुपये नोंदविण्यात आला. म्हणजेच ९ ऑक्टोबरच्या कमाल भावाच्या तुलनेत १३ ऑक्टोबरचा कमाल भाव २४९ रुपयांनी कमी होता.
Amravati News: आता ‘सेंट्रल किचन’ वर नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित
बाजारभावात चढ-उतार होत असल्याने शेतमाल विक्रीबाबत निर्णय घेणे कठीण जाते. सोयाबीनला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजाराकडे लक्ष ठेवून आहेत. आवक वाढली तरी दर टिकून राहिले पाहिजेत. शासनाने हमीभावाने खरेदीची प्रभावी व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
Ans: १ ऑक्टोबरला सोयाबीनची आवक शून्य होती. ९ ऑक्टोबरला ती ९ हजार ३३ पोत्यांवर, तर १२ ऑक्टोबरला १५ हजार ७५७ पोत्यांवर पोहोचली.
Ans: १३ ऑक्टोबरला सोयाबीनचा कमाल दर प्रतिक्विंटल ६ हजार ५५१ रुपये नोंदविण्यात आला.
Ans: बाजारपेठेत गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ६०० ते २ हजार ७०० रुपये दर मिळाला. ३ ऑक्टोबरला गव्हाचा कमाल दर २ हजार ७५० रुपयांवर पोहोचला होता.