Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : अमरावतीत ६२ टक्के पेरणी पूर्ण, रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल

Amravati News Marathi: अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला चांगली चालना मिळाली असून अवघ्या आठवडाभरात तब्बल १४ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 05, 2025 | 01:21 PM
अमरावतीत ६२ टक्के पेरणी पूर्ण, रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल

अमरावतीत ६२ टक्के पेरणी पूर्ण, रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल

Follow Us
Close
Follow Us:

  • रब्बी हंगामातील पेरणीला वेग
  • ९५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली
  • ६८ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी
अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला वेग आला असून आजवर ६२.१३ टक्के म्हणजे ९५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६८ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी तर २२ हजार ११३ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेरणीत १४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला चांगली चालना मिळाली असून अवघ्या आठवडाभरात तब्बल १४ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे. आजअखेर जिल्ह्यात ६२ टक्के म्हणजेच ९५ हजार ६८७ हेक्टरवर रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये हरभरा आणि गहू या मुख्य पिकांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १ लाख ५४ हजार १० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मागील आठवड्यात पेरणी ४९ टक्क्यांवर होती. ती यंदा ६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात शीतलहर! पारा १३ अंशावर, ढगाळ वातावरणासह थंडीची लाट; हवामान विभागाचा इशारा

रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल असून ६८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर त्याची लागवड झाली आहे. त्यानंतर गहू २२ हजार ११३ हेक्टर, मका १ हजार ३९३ हेक्टर, रब्बी ज्वारी १८५ हेक्टर, मोहरी २४ हेक्टर, जवस १० हेक्टर, तीळ ६ हेक्टर, भाजीपाला ५३० हेक्टर तर कांदा १ हजार ४२१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अद्याप ३८ टक्के पेरणी बाकी असून त्यातही हरभरा शेतकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे.

पेरणीत धामणगाव प्रथम तर चिखलदरा तालुका मागे

अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तब्बल १०० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर चिखलदरा तालुक्यात केवळ २४ टक्के पेरणी झाली असून दर्यापूर २८ टक्के, अंजनगाव सुर्जी ३८ टक्के, चांदूर बजार ४० टक्के पेरणीवर थांबली आहे. मात्र इतर तीन तालुक्यांमध्ये पेरणी ७० टक्क्यांच्या पुढे गेली आहे.

धामणगाव व धारणीमध्ये हरभरा-गहू पेरणीला प्रतिसाद

धामणगाव रेल्वे तालुक्यात गव्हाची सर्वाधिक ६ हजार ४६ हेक्टर तर हरभराची १२ हजार ८३४ हेक्टर पेरणी झाली आहे. धारणी तालुक्यात गहू ३ हजार ८२७ हेक्टर आणि हरभरा ८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर पेरला आहे.

१४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा

Web Title: Amravati 62 percent of sowing completed chickpea leads among rabi crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • amravati
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ravindra Chavan News:  कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर: रवींद्र चव्हाण
1

Ravindra Chavan News: कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर: रवींद्र चव्हाण

मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार की नाही? नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार की नाही? नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

कोथरूडमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उपायुक्तांना निवेदन
3

कोथरूडमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उपायुक्तांना निवेदन

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन
4

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.