Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : शेतकरी पुन्हा विळख्यात! जिल्ह्यात सावकारीचे वाढतेय ‘महाजाल’, तब्बल कोटींचं कर्जवाटप

अमरावती जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी सुमारे २.३४ लाख शेतकरी व नागरिकांना तब्बल ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सावकारीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 07:44 PM
सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत शेतकरी अडकले; मुदतवाढीची मागणी

सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत शेतकरी अडकले; मुदतवाढीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी बँकांचे थकबाकीदार
  • अतिवृष्टीमुळेही शेतकरी अडचणीत
  • शेतकऱ्यांसह नागरिकांचे आर्थिक शोषण
Farmers in trouble due to moneylending trap : अमरावती जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी सुमारे २.३४ लाख शेतकरी व नागरिकांना तब्बल ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सावकारीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीच्या चर्चामुळे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी बँकांचे थकबाकीदार ठरत आहेत, परिणामी त्यांना सावकारांकडे वळावे लागत असून अवैध सावकारीचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

पाटसमध्ये राजे उमाजी नाईक फलकाची तोडफोड; जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक

अतिवृष्टीमुळेही शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी २.३४ लाख शेतकरी तसेच नागरिकांना ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. कर्जमाफीच्या चर्चेमुळे काही शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली नाही. त्याशिवाय अतिवृष्टीमुळेही शेतकरी अडचणीत आले आणि बँकांचे थकबाकीदार राहिले. त्यामुळे त्यांना सावकारांच्या घरांच्या चकरा माराव्या लागल्या. या दरम्यान अनेक सावकारांकडून कर्जवाटप करण्यात आले. जिल्ह्यात सध्या सावकारीचे परवाने घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

शेतकऱ्यांसह नागरिकांचे आर्थिक शोषण

गल्लोगल्ली अवैध सावकारांनी दुकाने उघडली आहेत. या सावकारांकडून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची बाब समोर येत आहे. नागरिकांकडून तक्रार झाल्यावरच कारवाई होत असल्याने सावकार मनमानी पद्धतीने व्याजासह पैसे वसूल करीत आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई अमरावती जिल्ह्यात होत असल्याने अवैध सावकारी उघडपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. तसेच अनेक परवानाधारक सावकारांकडूनही अवैध सावकारी होत असल्याची बाब समोर आली. अनेक परवानाधारक सावकारांकडील बहुतांश कर्जवाटप कागदपत्रांवरच राहिले असताना सहाय्यक निबंधकांकडून कारवाई करण्यात आली नाही.

अमरावती, अचलपूरमध्ये सावकार :

जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकार असून त्यापैकी सर्वाधिक २५० अमरावती आणि १५३ अचलपूर तालुक्यात आहेत, तर सर्वात कमी ९ भातकुली तालुक्यात आहेत. मोर्शीमध्ये ३३, अंजनगाव सुर्जी २३, धामणगाव रेल्वे ३३, वरूड ४४, अचलपूर १५३, धारणी २१, नांदगाव खंडेश्वर १४, चांदूर रेल्वे ११, चांदूर बाजार ४३, तिवसा १९ आणि दर्यापूर तालुक्यात १४ परवानाधारक सावकार आहेत.

व्याजाचे दर

शेतकऱ्यांसाठी ०९ टक्के प्रतिवर्ष गहाण कर्ज
१२ टक्के प्रतिवर्ष बिनागहाण कर्ज

परवानाधारक सावकारांकडून कर्ज वितरणाची स्थिती

बिनाकृषी कर्जाचे कर्जदार ११७०७२ पैसे १७४४५.७५
गहाण कर्जाचे कर्जदार ११२६७४ पैसे १६,८५६.६५
बिनागहाण कर्जाचे कर्जदार ४३९८ पैसे ५८९.१०
एकूण कर्जाचे कर्जदार २३४१४४ पैसे ३४८.९१

पाषाण–बाणेर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करा; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

Web Title: Amravati news farmers debt moneylenders crisis marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati District
  • farmer
  • Farmer Crisis

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज
2

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

PM Kisan Yojana: 24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून
3

PM Kisan Yojana: 24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.