
अमरावती, (ब्युरो): अमरावती महानगरपालिकेने (AMC) शहरातील वाढत्या उष्णतेच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि ऊर्जा वापरात बचत करण्याच्या उद्देशाने ‘कूल रूफ उपनियम २०२५’ (Cool Roof By-laws 2025) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक उपक्रमामुळे शहरी उष्णता बेट (Urban Heat Island) कमी होईल आणि वातानुकूलनासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात लक्षणीय घट अपेक्षित आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “अमरावतीचे हवामान दिवसेंदिवस उष्ण होत आहे. कूल रूफ उपनियम २०२५ ही शहराच्या शाश्वत विकासाकडे टाकलेली मोठी झेप आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांसाठी थंड, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
‘कूल रूफ्स’ म्हणजे अशा छते किंवा पृष्ठभाग उपचार, जी सूर्यप्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतात आणि कमी उष्णता शोषतात. परिणामी: छताचे तापमान पारंपरिक छतांच्या तुलनेत ८ ते १२ अंश सेल्सिअसने कमी राहते. यामुळे वातानुकूलनावरील अवलंबित्व कमी होते आणि इमारतींमध्ये नैसर्गिक थंडावा निर्माण होतो. परावर्तक कोटिंग्स, ग्रीन रूफ्स (Green Roofs), लाइम वॉश (Lime Wash), सौरऊर्जा पॅनेल आणि सिंथेटिक मेम्ब्रेन (Synthetic Membrane) यांचा वापर यासाठी करण्यात येईल.
Amravati Crime: २ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश
‘सी ४०’ (C40) संस्थेच्या अहवालानुसार, वाढती उष्णता हा वीज वापर वाढवणारा मुख्य घटक आहे. कूल रूफ्समुळे अमरावतीच्या हवामानावर आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल: