अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याने एका तरुणाने थेट मुलीच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणीचे वडील गंभीर जखमी झाले असून आई देखील जखमी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव भारत (32) असे आहे. त्याचे एका मुलीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी त्याने त्या मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात होता. मुलीला तेलंगणातून परत आणण्यात आला होता. त्याला तीन महिने तुरुंगवास देखील भोगावे लागले होते. काही दिवसांपूर्वी ती मुलगी १८ वर्षांची झाली आणि कुटुंबीयांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरु केली. सोमवारी दुपारी एका मुलाने तिला पाहण्यासाठी घर गाठले. हे त्याला समजताच माजी प्रियकर भारत संतापला.
संध्याकळी जेवणानंतर मुलीचे वडील फेरफटका मारत बाहेर गेले. तेव्हा भारत आणि त्याचा साथीदार अक्षय (३०) यांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शास्त्रांनी वार करून हल्ला केला. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात, डोके आणि बोटांना दुखापत झाली आहे. मुलीच्या आईने पतीच्या मदतीसाठी धाव घेतली तेव्हा तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
तरुणीच्या वडिलांविरुद्धही गुन्हा
या हल्ल्यादरम्यान मुलीच्या वडिलांनी स्वतः बचाव करत वीट मारून भारतला जखमी केले. त्याचे दात पडले असून तोही गंभीर अवस्थेत आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.
आरोपी फरार
या घटनेत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भारत आणि अक्षयविरुद्ध प्राणघातक हल्ला, शिवीगाळ आणि मारहाण अश्या कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. सध्या भारत उपचार घेत आहे, तर अक्षय फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार डॉ. अनुप वाकडे यांनी दिली.या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे.
बँकेत नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा; तब्बल 16 लाखांना फसवले, अवघ्या आठ महिन्यांत…