
नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची 'मौन रणनीती' मित्रपक्षांसाठी घातक
यावेळी भाजपची भूमिका अत्यंत गूढ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोवत युतीची चर्चा सुरु होण्यापूचीच थांबली असल्याचे संकेत आहेत. शिवसेना (शिंदे गट) सोबत सलग बैठका सुरू असल्या, तरी या बैठकांमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नाही. राजकीय चर्चानुस्वर, या बैठका केवळ चहापान आणि छायाचित्रांपुरत्याच मर्यादित असल्याचा आरोप होत आहे. भाजपने मनपा निवडणुकीसाठी वेगळी राजकीय रचना आखल्याचे संकेत मिळत आहेत. राकाँ (अजित पवार) यांच्याशी युतीची चर्चा औपचारिक पातळीवर पोहोचण्यापूर्वीच संपल्याचे बोलले जाते. शिवसेना (शिंदे गट) सोबत बैठका सुरू असल्या, तरी या बैठकीतून कोणताही ठोस निष्कर्ष बाहेर पडलेला नाही. भाजप अंतिम क्षणापर्यंत मित्रपक्षांना अनिश्चिततेत ठेवून, परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळतात.
भाजप आणि काँग्रेसच्या या मौन धोरणामुळे दोन्ही आघाड्यांतील मित्रपक्ष ना मिळता येणाऱ्या, ना धुंकता येणाऱ्या अवस्थेत सापडले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना, मित्रपक्षांना ना स्थाए संकेत मिळतात, ना अंतिम दिशा. याचा थेट परिणाम जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकत्यांवर होत असून, संभ्रम, नाराजी आणि अंतर्गत असंतोष वाढताना दिसत आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, भाजप आणि काँग्रेस दोघेही या निवडणुकीकडे ‘प्री-असेम्बली टेस्ट’ म्हणून पाहत आहेत. मित्रपक्षांशिवाय स्वतःची मतशक्ती किती आहे. याचा अंदाज घेण्यासाठी महापालिका निवडणूक एक प्रयोगशाळा तरू शकते. त्यामुळे युती टिकवण्यापेक्षा स्वतःचा विस्तार आणि स्थानिक नेतृत्व मजबूत करणे हे दोन्ही पक्षांचे प्राधान्य असल्याचे दिसते. शिवसेना (शिंदे गट) यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर करून स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. ही कृती युतीवरील अवलचित्व कमी करण्याचा आणि स्वतःची संघटनात्मक ताकद मोजण्याचा प्रयत्न महणून पाहिली जात आहे.
महाविकास आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका वेगळी नाही शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याणी महापालिका निवासभांत कोणतीही ठोस, सार्वजनिक किया अंतर्गत चर्चा इाली नाही खातून काँग्रेसदेखील आघाडीपेक्षा पक्षा सूत्रावर चालत असल्याचे स्पष्ट होते. राज्यसारीय युती जरी अनितात असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ती आप लागू होईल, हा समज आता खोटा ठरत आहे.
शिवसेना (शिंदे गट) यांनी मनपा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. जिल्हाप्रमुख पराग पुढे यांनी १५. उमेदवारांची घोषणा केली आहे. विविध प्रभागांतील अनुभवी व नवोदित चेहऱ्यांचा त्यात समावेश आहे. ही यादी शिवसेनेच्या स्वतंत्र ताकद प्रदर्शनाचे संकेत देणारी मानली जात आहे.
राकाँ (अजित पवार) गटाचे नेते व आ. संजय खोडके यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राष्ट्रवादीने आपल्या ७५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांची गादी अंतिम केली आहे. अशा परिस्थितीत आता युती केल्यास अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. परंतु त्यांच्याकडून उत्तर यायचे आहे.त्यांचे जितके नगरसवेक होते.त्यानुसार जास्तीचे ऑफर दिले आहे. आमची इच्छा आहे की, युती व्हायला पाहिजे, परंतु, त्यांच्याकडून काही कळायला मार्ग नाही, याविषयी लवकरच माहिती पुढे येईल, असं मत भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केलं आहे.