संग्रहित फोटो
भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. एकीकडे उमेदवारी अंतिम करीत असतानाच हे प्रवेश करून घेतले जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, निवडणुक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत शनिवारी हे पक्षप्रवेश पार पडले.
माजी उपमहापाैर बराटे हे वारजे भागाचे लाेकप्रतिनिधीत्व करतात. बराटे हे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ पुण्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख हाेती. बराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना, आपण उमेदवारी मिळावी म्हणून आलेलाे नाही. पुर्वी मी पतित पावन संघटनेचे काम केले आहे, अशी माहीती त्यांनी दिली. तसेच माझा पुतण्या हा भाजपमध्ये काम करीत असुन, ताे निवडणुक लढविणार आहे, असे नमूद केले.
माजी नगरसेवक शिवरकर हे काॅंग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आहेत. २००७ साली ते महापालिकेत नगरसेवक म्हणून वानवडी भागातून निवडून आले हाेते. चाैदा वर्षाच्या अंतरानंतर मी पुन्हा राजकीय प्रवास भाजपमधून सुरु करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनाेगत व्यक्त करताना, बराटे आणि शिवरकर यांचे स्वागत केले. तर केंद्रीय राज्यमंत्री माेहाेळ यांनी बराटे यांच्या अनुभवाचा आम्हाला उपयाेग हाेईल, तसेच शिवरकर यांच्यासारखा तरूण कार्यकर्ता आम्हाला मिळाला आहे. त्यांच्या भागात भाजपची ताकद वाढण्यास मदत हाेणार असल्याचा विश्वास माेहाेळ यांनी व्यक्त केला.






