Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,’ वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला" असा आरोप त्यांनी सोशल मीडियातून केला.

  • By विवेक
Updated On: Jun 25, 2026 | 03:45 PM
'महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,' वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

'महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,' वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • हर्षवर्धन सपकाळ यांची वाढत्या गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका
  • राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याचा आरोप
  • “महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला” म्हणत महायुती सरकारच्या कारभारावर सपकाळ यांचा हल्लाबोल
 

राज्यात सततच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. अश्यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून आता यावरून राजकीय नेत्यांनीही राज्य सरकार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून फडणवीसांवर ताशेरे ओढत “महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला!” अश्या शब्दांत त्यांनी सुनावले आहे.

“महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला!”

हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडेतोड टीका केली. ते म्हणाले, “मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते… महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत… खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे…
पुण्यात विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी जातो… एका जिवंत महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला अटक करून मारहाण केली जाते… सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते…”

पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

“कायदा-सुव्यवस्थेची घसरण नाही, तर राज्यकर्त्यांचे अपयश”

ते पुढे म्हणाले, “मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपासून ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. भरदिवसा हत्या होतात, टोळ्या खुलेआम दहशत माजवतात, ड्रग्ज माफिया राज्यभर जाळं पसरवतात आणि सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या महाराष्ट्रात आज नागरिक स्वतःच्या सुरक्षेबाबत साशंक आहेत. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची घसरण नाही, तर राज्यकर्त्यांचे अपयश आहे.”

महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला! मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते… महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत… खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे…
पुण्यात विषारी… pic.twitter.com/OP7YBAiV1j
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 25, 2026

फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा सुव्यवस्था ढासळलेले राज्य म्हणून राज्याची ओळख

“सत्तेसाठी आमदार फोडा, खासदार फोडा, पक्ष फोडा, विरोधकांना संपवा… पण राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मात्र सरकारकडे ना इच्छाशक्ती आहे, ना धोरण, ना जबाबदारीची जाणीव! देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची ओळख ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे राज्य म्हणून निर्माण होत आहे. “महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला” हे आता वास्तव बनत आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Web Title: Harshvardhan sapkal slams devendra fadnavis over law and order in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.