
'लाडकीं'ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी
मात्र, आतापर्यंत जवळपास ५ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याने योजनेतील ४० हजारांहून अधिक लाभार्थी अपात्र ठरविण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माइरी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. योजनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. अपात्र लाभाध्यांच्या संख्येसह शासकीय कर्मचाऱ्यांकडूनही या योजनेचा लाभघेतल्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेतील लाभाथ्यांसाठी ई-केवायसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार १८ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे आणि इतर अनेक कारणे लक्षात घेता ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी आता शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत. या मुदतीत ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. मुदतीत केवायसी करून घेणे क्रमप्राप्त आहे.
राज्य सरकारच्या या योजनेत सद्यःस्थितीत जिल्ह्यात ६ लाख ५० हजारावर महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. सध्या ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी अंदाजे चार ते साडेचार लाख आहे. परिणामी उर्वरित लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २६.३ दशलक्ष अर्जांपैकी २४.३ दशलक्ष महिला पात्र असल्याचे आढळून आले आहे, तर तपासात सरकारी नोकरी करणाऱ्या सुमारे ८,००० महिला अपात्र असल्याचे आढळून आले आहे आणि वसुली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.