Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ शनिवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे पोहोचली. गुरुकुंज आश्रमात यात्रेचे स्वागत करताना वृक्षारोपण, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Sep 27, 2026 | 06:13 PM
seva sankap yatra amravati

seva sankap yatra amravati

Follow Us
Follow Us:
  • मोझरीतील गुरुकुंज आश्रमात ‘सेवा संकल्प यात्रे’चे स्वागत
  • रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण आणि विविध सेवा उपक्रम
  • विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
 

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ शनिवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे दाखल झाली. भाजयुमोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमात स्वागत करण्यात आलं. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

मोझरीतील गुरुकुंज आश्रमात पोहोचल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी आणि गादीचं दर्शन घेतलं. यावेळी यात्रेत सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचंही स्वागत करण्यात आलं.

रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण आणि विविध सेवा उपक्रम

यात्रेनिमित्त गुरुकुंज आश्रमात विविध सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. सेवा, समाजहित आणि ग्रामविकासाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला.

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकासाच्या विचारांचा उल्लेख केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लेखन आणि कार्यातून जनसहभागातून ग्रामोन्नतीचा विचार मांडला असून हाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत, असं त्यांनी म्हटलं. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोककल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केलं.

वडनगर ते वाराणसी सेवा संकल्प अभियानाचा हा प्रवास सेवा, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्काशी जोडण्यात आला आहे. या अभियानात सेवा, स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीसारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.

भाजपा, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

मोझरीतील कार्यक्रमाला भाजपा आणि भाजयुमोचे विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजयुमो अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह अमरावती विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थिती लावली.

सेवा उपक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अशा कार्यक्रमांमधून यात्रेचा सामाजिक संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Web Title: Vadnagar varanasi seva sankalp yatra amravati mozari ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Amravati News
  • PM Narendra Modi
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल
3

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.