Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षाबंधन होऊनही अंगणवाडीसेविका अद्यापही ‘त्या’ भत्त्याच्या प्रतिक्षेत; वेळोवेळी मिळतीये ‘तारीख पे तारीख’

सध्या मतचोरीवरून देशासह राज्यात धुरळा उडालेला असल्यामुळे राज्यकर्त्यांना ताईंच्या प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष द्यायला मिळतो की नाही? हा मोठा प्रश्न आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2025 | 09:20 AM
तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने 'लाडक्या बहिणी'चे पैसे घेतले? तर आता होणार 'ही' कारवाई

तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने 'लाडक्या बहिणी'चे पैसे घेतले? तर आता होणार 'ही' कारवाई

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना राज्य शासनाने सुरु केली. शासनाने लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरीकडे मात्र अंगणवाडीसेविकांच्या प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे अंगणवाडीसेविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

शासनाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बहिणींना अनुदान देऊन ‘रक्षाबंधन गिफ्ट’ दिले खरे; परंतु अंगणवाडी ताईंचे काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या मतचोरीवरून देशासह राज्यात धुरळा उडालेला असल्यामुळे राज्यकर्त्यांना ताईंच्या प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष द्यायला मिळतो की नाही? हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे बहिणींचे अनुदान तर दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज ऑनलाईन भरून सबमिट केले, त्या अंगणवाडी ‘ताईंना’ ही रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे.

दरम्यान, योजना सुरू होऊन वर्ष उलटले. परंतु त्यांच्या पदरी अजूनही प्रोत्साहन भत्ता पडायला तयार नाही. परिणामी, या ताईंची अवस्था संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभार्थ्यांसारखी होते की काय? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रोत्साहन भत्त्यातील एक रुपयाही अद्याप नाही

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थ्यांना वर्षभरापासून वेळेत अनुदान मिळत असताना या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईंनाही अद्याप छदाम मिळाला नाही. यासंदर्भात आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वारंवार निवेदने दिली. परंतु काही एक फायदा झाला नाही, असे अंगणवाडी सेविका माया म्हस्के यांनी सांगितले.

प्रोत्साहन भत्ता केव्हा मिळणार ?

योजना सुरू होण्यापूर्वी लाडक्या बहिणींचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सेविकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने कबुल केले होते. परंतु वर्ष उलटूनही सेविकांना कामाची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे सेविकाही रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.

अंगणवाडी सेविकांचे शासन दरबारी खेटे

अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शासनाने नवीन नियम लागू करून बहुतांश लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या निकषांत ज्या बहिणी पात्र आहेत. अशानांच आता हे अनुदान मिळणार आहे. नव्या निकषांनुसार, हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे.

Web Title: Anganwadi sevika waiting for incentive allowance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • Anganwadi Sevika
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार
1

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!
2

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
3

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.