Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

Cabinet Decision : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच सरकारी भूखंड वितरण धोरणात सुधारणा आणि बुलढाण्यातील गिरडा येथे श्री संत गजानन महाराज संस्थानाला कायमस्वरूपी बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Oct 14, 2026 | 03:12 PM
maharashtra cabinet

maharashtra cabinet

Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव
  • सरकारी भूखंडांच्या वितरण धोरणात सुधारणा
  • गजानन महाराज संस्थानाला कायमस्वरूपी बांधकामाची परवानगी
 

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (बुधवार, 14 ऑकटोबर) महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची कॅबिनेट बैठक पार पडली.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

सरकारी भूखंडांच्या वितरण धोरणात सुधारणा

सरकारी मालकीच्या काही भूखंडांच्या वितरणाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्रपणे बांधकाम करण्यास अयोग्य असलेले, चिंचोळ्या आकाराचे, उपयुक्त आकार नसलेले किंवा पोहोच मार्ग नसलेले भूखंड वितरित करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ३७ आणि ३७ अ यांच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात येणार आहेत. महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित या निर्णयामुळे अशा भूखंडांच्या वितरण प्रक्रियेत बदल होणार आहे.

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! 3 अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

गजानन महाराज संस्थानाला कायमस्वरूपी बांधकामाची परवानगी

बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथे यात्रास्थळाच्या विकासासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

संस्थानाला यापूर्वी वृक्षलागवडीसाठी १९ हेक्टर ६ आर जमीन देण्यात आली होती. यापैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर आता बांधकाम करता येणार आहे. या निर्णयामुळे गिरडा येथील यात्रास्थळाचा विकास करण्यास आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे यशस्वीपणे जनसेवा केल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील ठराव मांडला.

या ठरावाला मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत केले. त्यामुळे या बैठकीत मोदींच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा मुद्दा चर्चेत राहिला.

शेतकऱ्यांसाठी घेतला आणखी एक महत्वाचा निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत याशिवाय आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलं आहे. बैठकीत राज्यातील आणखी 40 तालुक्यांचा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी म्हणजे यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये मदत म्हणून जमा करण्यात येणार आहेत.

एकूणच, या बैठकीत अभिनंदनाचा ठराव, सरकारी जमीन वितरण धोरणातील सुधारणा आणि धार्मिक स्थळाच्या विकासासाठी मंजुरी असे तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मोठी बातमी ! राज्यात अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी आता बंद; फ्लॅट खरेदीतील फसवणूक टळणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले?

    Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. सरकारी भूखंड वितरण धोरणात सुधारणा आणि गिरडा येथे गजानन महाराज संस्थानाला बांधकामाची मंजुरी हे अन्य दोन निर्णय आहेत.

  • Que: सरकारी भूखंड वितरण धोरणात नेमका काय बदल होणार आहे?

    Ans: स्वतंत्र बांधकामासाठी अयोग्य, चिंचोळ्या आकाराचे, उपयुक्त आकार नसलेले किंवा पोहोच मार्ग नसलेले सरकारी भूखंड वितरित करण्याच्या धोरणात सुधारणा होणार आहे. यासाठी १९७१ च्या महाराष्ट्र जमीन महसूल नियमांतील नियम ३७ आणि ३७ अ मध्ये बदल करण्यात येणार आहेत.

  • Que: गजानन महाराज संस्थानाला गिरडा येथे किती जमिनीवर बांधकाम करता येणार आहे?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथे वृक्षलागवडीसाठी यापूर्वी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर संस्थानाला कायमस्वरूपी बांधकाम करता येणार आहे.

Web Title: Maharashtra cabinet decision government land new rules drought farmer aid vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Cabinet Decision
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
1

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
2

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
3

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
4

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.