Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Majhi Ladki bahin Yojna: माझी लाडकी बहीण योजनेतील पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज बाद

महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 11, 2024 | 01:28 PM
'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन

'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना रद्द होणार, अशा चर्चा निवडणुकीपूर्वी सुरू होत्या. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात एकच खळबळ माजली होती. पण योजना बंद होणार नाही. असे त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं होते.  पण निवडणुकीनंतर राज्यात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू झाली असून त्यात आतापर्यंत  1 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.  निकषात न बसणारे अर्ज बाद करण्यात आले आल्याची माहिती  आहे.

महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले. आता निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली आहे. यात आतापर्यंत 9814 अर्ज निकषात न बसल्यामुळे  अपात्र ठरल्याची माहिती आहे.  आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील  20 लाख 84  हजार 364  महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर  एकूण अर्जदारांपैकी 69 हजार, 175 अर्जदारांची आधार कार्ड  बँक खात्याशी जोडले गेले आहे की नाही, याची तपासणी बाकी आहे.

सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध तर पित नाही ना? 1 लिटर केमिकलपासून बनवले 500 लिटर,

महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  जामसिंग गिरासे यांनी दिलेल्या माहिती नुसार,  5724 अर्जांमध्येही काही किरकोळ त्रुटी असल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पण त्यांना त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज सादर करता येणार आहे. तर एकूण  12 हजार अर्जांची छाननी बाकी आहे. म्हण्जेच 99.43 टक्के अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. या योजनेतील  जिल्ह्यातील शिल्लक अर्ज मंजूर करण्याची प्रक्रियादेखील सुरू कऱण्यात आली आहे.  सध्या दहा हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. तर, लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार हे सरकारकडून जाहीर केले जाईल.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतंर्गत  पिंपरी-चिंचवड शहरातील  4 लाख 32 हजार, 890  महिलांनी अर्ज भरला होता. त्यांपैकी 3 लाख 89 हजार, 920 महिला पात्र ठरल्या, त्यांना योजनेंतर्गत नोव्हेंबर पर्यंतचा लाभही मिळाला. तर 42 हजार,  486 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.  यात  रहाटणी येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक 65871 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर  पांजरपोळ आणि भोसरी येथील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय भागातील 63106  आणि थेरगाव येथील 60 033 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

Majhi Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना परत द्यावे लागणार योजनेचे पैसे?

Web Title: Applications of 10 thousand women from pune rejected in majhi ladki bhaeen yojana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Maharashtra Women's
  • majhi Ladki Bahin yojna

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
4

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.