फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्हाला माहितच असेल की, अलीकडे भेसळयुक्त गोष्टीं विकण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्या पदार्थामध्ये काय भेसळ केले आहे ते आपल्याला सांगणे कठीण आहे. व्हायरल व्हिडिओ देखील संबंधित आहे. या व्हिडिओ भेसळयुक्त दुध कसे बनवले जाते याचा डेमो देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील असून पोलिसांनी दूधात भेसळ करणाऱ्यांना अटक केला असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये 1 लीटर रसायनांचा वापर करून 500 लीटर सिंथेटिक दूध तयार करणाऱ्या ला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, संबंधित व्यावसायिकावर 20 वर्षांपासून नकली दूध आणि पनीर विक्रीचा आरोप असल्याचे उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितले आहे.
अस्सल दूधासारखा स्वाद व गंध निर्माण करण्यासाठी तो रसायनांसह कृत्रिम मिठास व फ्लेवर मिसळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणाने ( FSSAI ) या व्यावसायिकाच्या दुकानावर छापे टाकले आहेत. त्यांवेळी त्यांना मोठ्या प्रमामात मिश्रित रसायने सापडली जी जप्त करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मिलीलीटर रसायनांचा वापर करुन दूध विक्रेता 2 लिटर दूध तयार करत होता.
ज्याची चव, गंध व रंग अस्सल दुधासारखा दिसावा यासाठी विशिष्ट फ्लेवर एजंट्सचा वापर करण्यात येत होता. तसेच छापेमारीत रसायनांमध्ये कास्टिक पोटॅश, मट्ठा पावडर, सोर्बिटोल, दूध परमीट पावडर आणि परिष्कृत सोया वसा आढळले आहे. काही रसायने दोन वर्षांपूर्वीच एक्सपायर झाल्याचे समोर आले आहेत. संबंधित व्यावसायिकाने या फॉर्म्युलाचा उपयोग गावातील इतर दूध विक्रेत्यांना शिकवला असल्याचा आरोपही आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
एक होता है मिलावटी, दूसरा होता है नकली। 100% नकली दूध बनाने का डेमो देखिए। कई केमिकल मिलाकर एक सफेद घोल तैयार हुआ। उसे नेचुरल पानी में डाला और दूध बनकर तैयार। इस 1 लीटर केमिकल से 500 लीटर दूध बनता है। फार्मूला बनाने वाला अजय अग्रवाल गिरफ्तार है।
📍बुलंदशहर, उत्तर प्रदेश pic.twitter.com/00tkeujkGM— शिक्षक वाणी (@sirjistp) December 8, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नकली दूधमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांवर चर्चा सुरू आहे. संबंधित व्यावसायिकाची ही पद्धत सार्वजनिक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. नकली दूध, त्याची उत्पादने आणि या प्रकारांमुळे होणारे संभाव्य धोके याविषयी जागरूकता वाढवणे आता अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतापजनक अशी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.