Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नेमणूक; पुण्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच

  • By युवराज भगत
Updated On: Feb 07, 2024 | 08:50 PM
Appointment of Suhas Diwase as the new Collector of Pune; Dr. Replaced by Rajesh Deshmukh

Appointment of Suhas Diwase as the new Collector of Pune; Dr. Replaced by Rajesh Deshmukh

Follow Us
Follow Us:
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत असून, पुणे जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
सुहास दिवसे हे याआधी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी कार्यरत होते. डॉ. राजेश देशमुख हे आता सुहास दिवसे यांच्या जागी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी
त्या अगोदर दिवसे हे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २००५ मध्ये युपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते. दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले. तसेच, त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला.
पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती

दरम्यान, पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आल्यानंतर रितेश कुमार यांची पदोन्नतीने राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या पुणे पोलिस पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तपदी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली

राज्यातील 59 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी राज्य राखीव दलाचे समादेशकशैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे पोलिसांच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली

राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या मागील आठवड्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Appointment of suhas diwase as the new collector of pune replaced on dr rajesh deshmukh nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 08:49 PM

Topics:  

  • pune breaking
  • Pune Collector
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
2

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
4

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.