
Pune Football Tournament
या स्पर्धेच्या दुसऱ्या बाद फेरीत रोहीत रावत आणि प्रविण कावडे यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर पुणेरी वॉरीयर्स एफसीने ईगल एफसीचा २-१ आस पराभव केला. अबुबाकार मणीयार याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर दुर्गा स्पोर्ट्स ॲकॅडमीने भारती एफसी संघाचा १-० असा पराभव केला. शुभम पोटघन याने केलेल्या केलेल्या गोलपूर्ण कामगिरीने इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबने जायंट्स एफसी ब संघाचा १-० असा पराभव केला. आयएयफा संघाने बोपोडी एलएफए एफसीचा ३-० असा सहज पराभव केला. सामन्यात शुभम महापडी, रियान यागीद्री आणि वेदांत मुतेकर यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
चुरशीने लढल्या गेलेल्या सामन्यात स्निग्मय पुणे एफसी संघाने सडनडेथमध्ये स्पोर्ट्स मेनिया संघाचा ९-८ असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. स्निग्मय संघाकडून सीजन सीमॉन, गुलाम अन्सारी, सुखदेव पाटील, मोहम्मद आशिक, पीजी. सुआंगुंगलुंग, अबिन ऑगस्टीन, ललित पाटील, कृष्णा कारंडे यांनी गोल केले. स्पोर्ट्स मेनिया संघाकडून सौरभ पाटील, विजय मरीमुथ्थू, प्रणीत भड, शौनक धापटे, शौर्य आनंद, अथर्व निवडेकर, आर्यन वडघुले आणि निमीष फाटक यांनी गोल केले. पुणे वॉरियर्स वि. वि. ईगल एफसी(२-१), दुर्गा स्पोर्ट्स वि. वि. भारती एफसी (१-०), पुणे एफसी वि. वि. स्पोर्ट्स मेनिया (९-८), इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबने वि. वि. जायंट्स एफसी ब (१-०)
IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात
१) पुणेरी वॉरीयर्स एफसीः २ (रोहीत रावत २५ मि., प्रविण कावडे ६० मि.) वि.वि. ईगल एफसीः १ (थींगरीली यिंगबिथाँगर ५९ मि.);
२) दुर्गा स्पोर्ट्स ॲकॅडमीः १ (अबुबाकार मणीयार २५ मि.) वि.वि. भारती एफसीः ०
३) स्निग्मय पुणे एफसीः ९ (सीजन सीमॉन २२ मि., गुलाम अन्सारी ३४ मि., सुखदेव पाटील, मोहम्मद आशिक, पीजी. सुआंगुंगलुंग, अबिन ऑगस्टीन, गुलाम अन्सारी, ललित पाटील, कृष्णा कारंडे) सडनडेथमध्ये वि.वि. स्पोर्ट्स मेनियाः ८ (सौरभ पाटील ११ मि., विजय मरीमुथ्थू ३७ मि., प्रणीत भड, शौनक धापटे, शौर्य आनंद, अथर्व निवडेकर, आर्यन वडघुले, निमीष फाटक); पूर्णवेळः १-१; टायब्रेकः ४-४; सडनडेथः ४-३
४) इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबः १ (शुभम पोटघन ४९ मि.) वि.वि. जायंट्स एफसी बः ०
५) आयएयफाः ३ (शुभम महापडी ८ मि., रियान यागीद्री २४ मि., वेदांत मुतेकर ५५ मि.) वि.वि. बोपोडी एलएफए एफसीः ०
Ans: स्निग्मय पुणे एफसीने दुसऱ्या बाद फेरीत स्पोर्ट्स मेनिया संघाचा सडनडेथमध्ये ९-८ असा रोमांचक पराभव केला.
Ans: पुणेरी वॉरियर्स एफसी, दुर्गा स्पोर्ट्स ॲकॅडमी, इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब आणि आयएयफा या संघांनी दुसऱ्या बाद फेरीतील विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.