मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण (ShivSena Bow And Arrow) हे चिन्ह गोठविण्याचा (Freeze) निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याने दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचा, पक्षाच्या नावाचा वापर करता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर, राज्याच्या राजकारणातून तसेच अन्य क्षेत्रातून विविध संतप्त व संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर दोन्ही गटाकडून बैठकाचं सत्र (meeting) सुरु झाले असून राजकीय हालचालीना वेग आला आहे. तसेच शिवसेनेकडून या निषेध करत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
[read_also content=”शिवसेना बाळासाहेब ठाकरे…दोन शिवसेना बाळासाहेब प्रबोधकार ठाकरे, व तिसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेनेकडून तीन नावं जाहीर https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-three-name-and-three-symbol-send-to-election-commission-334331.html”]
दरम्यान, निवडणुकीच्या या निर्णयावर शिवसेना खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी थेट शिंदे गट तसेच शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिलं आहे. तुम्ही आमचं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं…पण तुम्ही आमचं रक्त पेटवलं असा गर्भित इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला दिला आहे. आता शिवसेना शांत बसणार नाही, तर जोमाने पुन्हा पेटून उठेल. शिवसैनिक नव्या उमेदीनं कामाला लागतील, पक्षबांधणीसाठी व वाढीसाठी कामाला लागतील. त्यामुळं तुम्ही आमचं फक्त चिन्ह गोठवल नाही तर, तुम्ही आमचं रक्त पेटवलं आहे, असा इशारा व आव्हान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.