Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न

गणेशोत्सवात मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांहून अधिक कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2025 | 03:50 PM
दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला पसंती; तब्बल 21.44 कोटींची झाली तिकीट विक्री

दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला पसंती; तब्बल 21.44 कोटींची झाली तिकीट विक्री

Follow Us
Follow Us:

मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेस द्वारे १५ हजार ३८८ फेऱ्यातून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Thane News : महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे , असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

दरम्यान गणपती विशेष जादा बस चालवण्यासाठी राज्यातील इतर विभागातून बस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथील विभागात पाठवण्यात येतात. त्यानंतर या बसचे गट आरक्षण झाल्यानंतर, त्या परतीचा प्रवास करताना रिकाम्या येत होत्या. त्यामुळे महामंडळाचा इंधनावर जादा खर्च होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी ३० टक्के जादा भाडेवाढ केली होती. मात्र या निर्णयाबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला.

राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर आज एकदिवसीय संपावर; रुग्णसेवेवर होणार परिणाम

Web Title: As many as six lakh konkan residents traveled by st during ganeshotsav 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • thane

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
1

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू
2

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू

MSRTC Fare Hike: ‘एसटी तोट्यात असली तरी…’, १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय
3

MSRTC Fare Hike: ‘एसटी तोट्यात असली तरी…’, १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
4

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.