Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari Sohla: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज; देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलपूजेसाठी दाखल

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री विठ्ठल-रुखमाईची शासकीय पूजा करतात. ही परंपरा सन 1973 पासून सुरु झाली असून, दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एक मानाचे वारकरी दाम्पत्य देखील या पूजेला उपस्थित असते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 05, 2025 | 05:16 PM
Ashadhi Wari Sohla: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज; देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलपूजेसाठी दाखल
Follow Us
Follow Us:

Pandharpur News: आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. टाळ मृदंगआणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी एका वाक्यात संपवला ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा विषय; म्हणाले, “श्रद्धेय बाळासाहेबांचे

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हालेली असून, रविवार, ६ जुलै रोजी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक आज पंढरपूरात दाखल होणार आहेत.मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे पहाटे २.२० वाजता विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा करतील. या पवित्र क्षणासाठी पंढरपूर मंदिर परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले आहे.

राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच अधिकारीवर्गही या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख मार्ग, वेशी, रस्ते, आणि मंदिर परिसर फुलांनी, विद्युत रोषणाईने सजवण्यात आला असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. विठुरायाच्या जयघोषात, टाळ-चिपळ्यांच्या गजरात आणि ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल’च्या घोषणांनी पंढरपूर नगरी दुमदुमली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी दाम्पत्याला विठुरायाच्या पुजेचा मान

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री विठ्ठल-रुखमाईची शासकीय पूजा करतात. ही परंपरा सन 1973 पासून सुरु झाली असून, दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एक मानाचे वारकरी दाम्पत्य देखील या पूजेला उपस्थित असते. हे वारकरी दाम्पत्य कोण असेल, याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती घेते. विशेष बाब म्हणजे या निवडीसाठी कोणतीही राजकीय शिफारस, वशिला किंवा ओळख चालत नाही.

 भारताचे Olympics 2036 च्या यजमानपदासाठी प्रयत्न! IOC ने दिल्या ‘या’ गोष्टी सुधारण्याच्या सूचना.. 

महापूजेचा मान कशावरून मिळतो?

शासकीय पूजेसाठी पहाटेच्या वेळी मंदिराचे दरवाजे बंद करून पूजा पार पडते. याच वेळी, दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो. म्हणजे, जे वारकरी दाम्पत्य त्या क्षणी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर दर्शनासाठी सर्वात अगोदर उभं असतं, त्यांनाच शासकीय महापूजेसाठी निमंत्रित केलं जातं.

निवड प्रक्रिया पारदर्शक व श्रद्धेवर आधारलेली

ही संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक आणि श्रद्धायुक्त आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. योगायोगाने पहिल्या क्रमांकावर असणं हेच या पूजेसाठी पात्रतेचे एकमेव निकष मानले जातात. निवड झालेल्या दाम्पत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील करण्यात येतो. ही परंपरा हजारो भाविकांसाठी श्रद्धेचा आणि अभिमानाचा क्षण असतो. विठुरायाच्या कृपेने कोणीही या मानासाठी पात्र ठरू शकतो, हे या प्रक्रियेच्या पारदर्शकतेतून अधोरेखित होते.

Web Title: Ashadhi wari sohla pandharpur ready for ashadhi ekadashi devendra fadnavis and his wife arrive for vitthal puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Ashadhi Wari Sohla
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

‘अण्णा हजारेंच्या आंदोलना आडून भाजपा-आरएसएसचा अजेंडा..,’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘अण्णा हजारेंच्या आंदोलना आडून भाजपा-आरएसएसचा अजेंडा..,’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा
3

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन
4

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.