Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!

Devendra Fadnavis on Eknath Shinde : मंगेश चिवटे यांनी पुणे विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. तसेच विधानपरिषदेच्या पाचही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Oct 14, 2026 | 10:00 PM
Eknath shinde devendra fadnavis

Eknath shinde devendra fadnavis

Follow Us
Follow Us:
  • मंगेश चिवटे यांच्या उमेदवारी माघारीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चां
  • देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
  • विधानपरिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा फडणवीसांचा विश्वास
 

Devendra Fadnavis on Eknath Shinde : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्यातील जागांवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून चर्चा रंगली होती. शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपनेही उमेदवार रिंगणात उतरवल्याने महायुतीत नेमकं काय सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर चिवटे यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कील शब्दांत प्रतिक्रिया दिली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “शिंदेसाहेब नाराज नाहीत. तुम्ही सगळे नाराज आहात.” विनाकारण अफवा पसरवू नका, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पुणे विधानपरिषद निवडणुकीत काय घडलं?

पुण्यातील विधानपरिषदेच्या जागांवरून भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगली होती. मंगेश चिवटे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित झाले. मात्र, शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर फडणवीसांनी स्पष्टपणे नकार दिला.

Bhiwandi News : भिवंडीत राजकीय भूकंप! महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद पेटला, समाजवादीच्या ६ नगरसेवकांची जागेवरच हकालपट्टी!

पुणे पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी भैय्या माने आणि शरद लाड यांनी स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते, आमदार आणि पदाधिकारी मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी मंजुरी

यावेळी फडणवीसांनी पुण्यातील वैद्यकीय सुविधांबाबतही माहिती दिली. ईएसआयसी रुग्णालयाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्रीय स्तरावरून एमबीबीएसच्या ५० जागांसह रुग्णालयाला मान्यता मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. यासाठी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. माधुरी ताई आणि मुरली अण्णा यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं.

विधानपरिषदेच्या पाचही जागा जिंकण्याचा विश्वास

आगामी निवडणुकीबाबत बोलताना फडणवीसांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. विधानपरिषदेच्या एकूण पाच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असं ते म्हणाले. पुणे शिक्षक मतदारसंघासह अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचाही त्यांनी उल्लेख केला.

अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व नगरसेवकांनी निवडणुकीच्या कामात सक्रिय राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आता उमेदवारांचा प्रचार, पक्षांतर्गत समन्वय आणि महायुतीची पुढील रणनीती याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

‘विरोध केल्यास खलास करू’; राष्ट्रवादीच्या आमदाराला धमकीचे पत्र, समान नागरी कायद्यावरून मोठी खळबळ!

Web Title: Devendra fadnavis on eknath shinde upset rumours pune mlc election vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • MLC Election
  • pune news

संबंधित बातम्या

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद
1

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी
2

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
3

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!
4

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.