Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?; अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे, अशी शिवसेनेची (शिंदे गट) इच्छा आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठका आणि परिषदांमध्ये अजित यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारी पोस्टर्स आणि वक्तव्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 04:33 PM
काही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार आमने सामने असणार आहेत. त्यामुळे नेते कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता आहे.

काही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार आमने सामने असणार आहेत. त्यामुळे नेते कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता आहे.

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी सर्वच पक्षांमध्ये आपापल्या पातळीवर योग्य जागा व उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, यावरूनही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अशातच भाजप खासदार  अशोक चव्हाण यांनी महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंबंधी मोठे भाष्य केल आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

महायुतीचे घटक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील, असा दावा भाजप खासदार चव्हाण यांनी केला आहे. मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही असेही त्यांनी नमुद केले आहे.  म्हणजेच महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत तूर्तास सस्पेन्स असणार आहे.

महायुतीतील घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते एकत्रितपणे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठरवतील. त्याचप्रमाणे विधानसभेत किती जागा कोणाला मिळतील, हेही तेथील परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून आहे, ज्या पक्षाच्या विजयाची अधिक शक्यता आहे, त्या पक्षाला ती जागा  मिळणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा: झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारण काय?; चंपाई सोरेन यांनी दिलं उत्तर

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीतही मुख्यमंत्री पद आणि जागा वाटपासदंर्भात मोठे मतभेद असल्याचे दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते  सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा करत असले तरी जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे दोन्ही आघाड्यांमधील अनेक नेत्यांनामध्ये मुख्यमंत्री  पदासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे.

किमान या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन असे अनेक नेते फडणवीस यांना पुढील मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या गटातील नेतेही आपापल्या नेत्यानेच मुख्यमंत्री व्हावे, असे बोलताना दिसत आहेत.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे, अशी शिवसेनेची (शिंदे गट) इच्छा आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठका आणि परिषदांमध्ये अजित यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारी पोस्टर्स आणि वक्तव्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत.

हेदेखील वाचा: मैत्री पासून Hate You पर्यंत…, बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये वादाचे खटके

अधिक आमदारांसाठी सूत्र

विशेष म्हणजे महाविकास आघाडीप्रमाणे भाजपमध्येही ज्याच्याकडे जास्त आमदार असतील तोच मुख्यमंत्री या सूत्रावर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशा स्थितीत आघाडीत सहभागी पक्ष जास्तीत जास्त आणि जिंकता येण्याजोग्या जागा मिळविण्याचा प्रयत्न करत असून त्यानुसार उमेदवारांचा शोधही सुरू झाला आहे.

आमदारांना तिकीटाची भीती

भाजपमधील इच्छुकांची यादीही मोठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विशेषत: भाजप मोठ्या सावधगिरीने उमेदवार निवडणार असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि संख्याबळाच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळवता येईल. अशा परिस्थितीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा: नबान्नाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, आंदोलकांनी केली दगडफेक 

Web Title: Ashok chavan speaks clearly on who will be cm face of mahayuti for maharashtra legislative assembly election 2024 nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • Maharashtra Legislative Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
1

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर
3

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा
4

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.