Photo credit- Social media
झारखंड: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन येत्या 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नाराजीच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी झारखंडमुक्ती मोर्चाला रामराम करण्याचा निर्णय़ घेतला. पण त्यांनी हा निर्णय का घेतला, यावर चंपाई सोरेन यांनी पहिल्यांदाच त्यांच्या बंडखोरीबाबत उघड वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, यावर भाष्य केलं आहे.
चंपाई सोरेन यांनी सांगितले की, आपल्या राजकीय प्रवासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी मी ३० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आपण हा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा: राज्यातले 9 बडे नेते सोडणार महायुतीची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
चंपाई सोरेन यांना झामुमो’चे संस्थापक शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात. मात्र त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, “माझी परिस्थिती अशी होती की, मला गाडी चालवायला दिली गेली आणि वाटेत अचानक चावी मागितली. मला पार्किंगमध्ये गाडी उभी करायलाही जागा दिली गेली नाही.”
“राजकीय संकटात चढ-उतार येत असतात. आम्ही रक्त आणि घाम गाळून संघटनेला पाणी दिले, पण आम्हाला कोणीही मान दिला नाही. नेतृत्व बदलासाठी माझे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. बळाचा वापर करण्यात आला. मी गप्प राहिलो पण माझे मन दुखी होते.”
हेदेखील वाचा: नबान्नाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, आंदोलकांनी केली दगडफेक
जेएमएमचे केंद्रीय अध्यक्ष शिबू सोरेन यांच्याबाबत बोलताना , “आम्ही संघटनेत घाम गाळला आहे. गुरुजी माझे आदर्श आहेत. ते अशक्त आहेत आणि आता बोलू शकत नाहीत, त्यामुळे मी माझ्या मनातील वेदना कोणाला सांगू शकत नाही. आम्ही आमच्या भावना पोस्ट केल्या आहेत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.