Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या ‘काळ्या साम्राज्या’चा विस्तार पुण्यापर्यंतही; 18 रो हाऊस अन् 49 गुंठे जागा

शिवनिका ट्रस्ट आणि इतर संशयास्पद मार्गांनी जमा झालेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी पोफळेनेच या गुंतवणुकीचे नियोजन केल्याचा पोलिसांना संशय आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 09:35 AM
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या 'काळ्या साम्राज्या'चा विस्तार पुण्यापर्यंतही; 18 रो हाऊस अन् 49 गुंठे जागा

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या 'काळ्या साम्राज्या'चा विस्तार पुण्यापर्यंतही; 18 रो हाऊस अन् 49 गुंठे जागा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात एसआयटी तपासात दररोज नवी माहिती समोर येत आहे. आता भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे यांच्या संपत्तीचा थक्क करणारा आकडा समोर आला आहे. पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागात खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या मालकीचे १८ रो हाऊस असून, नाशिक परिसरातील ४९ गुंठे जमिनीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या जमिनीचा व्यवहार कागदोपत्री १९ कोटी ५६ लाखांना दाखवून पूर्ण केल्याचे समोर आले आहे.

शिवनिका ट्रस्ट आणि इतर संशयास्पद मार्गांनी जमा झालेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी पोफळेनेच या गुंतवणुकीचे नियोजन केल्याचा पोलिसांना संशय आहे. या मालमत्तांची खरेदी, त्यामागील आर्थिक स्रोत आणि संभाव्य बेनामी व्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी करण्यात येत आहे. खरातचा सीए पोफळेच्या या व्यवहारावर सवाल उपस्थित होत आहेत. या गुंतवणुकीसाठी पोफळेकडे एवढा पैसा आला कुठून ? यामागे खरातचा प्रत्यक्ष संबंध आहे का? तसेच खरात सीएकरवी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत होता का? त्याच्या काळ्या पैशांत नेत्यांचा वाटा आहे का? असे प्रश्न यामुळे उभे राहिले आहेत.

अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे. या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे असल्याचे दिसून येते.

लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती

नाशिक येथे पार पडलेल्या या लग्नसमारंभालाही अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या निमित्ताने अशोक खरात आणि विविध पक्षांतील नेत्यांमधील जवळीक अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे. हे नेते कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरात यांचा सल्ला घेत असत, असेही म्हटले जात आहे.

घरी, प्लँट भेटीसाठी उकळायचा लाखो रुपयेे 

मंत्र-तंत्राच्या नावाखाली भोंदूबाबा खरातने सामान्यांसह बड्या उद्योजकांची फसवणूक केली आहे. खरातचे अनेक भक्त, त्याचा सल्ला, मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला घरी बोलवायचे. व्यवसाय चालतो त्या ठिकाणी जाण्यासाठी खरात त्या लोकांकडून ५ लाख रुपये फी घेत असे. भोंदूबाबा खरातची संपत्ती २०० नाही, तर २ हजार कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. मिरगाव येथे खरातच्या नावावर ३३ एकर जमीन आणि एक फार्महाऊस आहे. पाथर्डी आणि गवाणे गावात १० एकर जमीन, सिन्नरमध्ये ६ एकर जमीनही आहे.

हेदेखील वाचा : Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

Web Title: Ashok kharat dark empire extends even to pune 18 row houses and 49 gunthas of land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik News

संबंधित बातम्या

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणार ते ४५ बडे नेते कोण?
1

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणार ते ४५ बडे नेते कोण?

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
2

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई

Maharashtra Politics : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका
3

Maharashtra Politics : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका

Anjali Damania : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या
4

Anjali Damania : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.