Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई

पुणे आणि नाशिक पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कल्पनासह एकूण पाच जणांवर फसवणूक आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 07:57 AM
भोंदू खरातचा मुलगा अटकेत, पत्नी फरार

भोंदू खरातचा मुलगा अटकेत, पत्नी फरार

Follow Us
Follow Us:

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. खरातच्या कुटुंबावर पोलिसांनी फास आवळला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ पथकाने मंगळवारी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला अटक केली. मात्र, खरातची पत्नी कल्पना ही फरार झाली आहे. पोलिसांकडून आता कल्पनाचा शोध घेतला जात आहे.

शिर्डीतील जमीन खरेदीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात तपास यंत्रणा कल्पना खरातला अटक करण्यासाठी पोहोचल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच ती पसार झाली. सूत्रांनुसार, पुणे आणि नाशिक पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कल्पनासह एकूण पाच जणांवर फसवणूक आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करून न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशोक खरात याची पोलिस कोठडी बुधवारी संपणार आहे. पोलिस आता त्याची पत्नी कल्पना खरात आणि दुसरा आरोपी अशोक तांबे यांनाही लवकरच अटक करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठी फसवणूक झाली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.

नाशिकमधील डॉक्टर रडारवर

एसआयटीला एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. मात्र, त्यापैकी एकही महिला गरोदर राहिली नाही. या प्रकरणात नाशिकमधील काही स्थानिक डॉक्टरांची भूमिका असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या संशयावरून पोलिस नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

पीडित कुटुंबांवर आली ‘वर्क फ्रॉम होम’ची पाळी

ढोंगी तांत्रिक खरातचे अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पीडित कुटुंबांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरातचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासोबतच पॉर्न साईट्सपर्यंत पोहोचले आहेत. एका पीडित कुटुंबातील व्यक्तीनुसार, या कारणामुळे ते ऑफिसला जाऊ शकत नाहीत आणि त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागत आहे.

हेदेखील वाचा : Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

Web Title: Ashok kharat son arrested in shirdi land purchase fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
1

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
3

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.