Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Education : अंकातून भविष्य मांडणार भोंदूबाबा गणितात फेल; अशोक खरात 10 वी नापास

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची शैक्षणिक पात्रता समोर आली आहे. अंकशास्त्राचा दावा करुन लोकांच्या भविष्याची गणितं मांडणारा हा भोंदूबाबा मात्र गणितामध्ये नापास झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 25, 2026 | 11:44 AM
Ashok Kharat Crime

Ashok Kharat Crime

Follow Us
Close
Follow Us:
  • अशोक खरातचे शैक्षणिक पात्रता समोर
  • भोंदूबाबा अशोक खरात 10 वी नापास
  • अशोक खरातला गणितामध्ये 28 मार्क
 

Ashok Kharat Education : नाशिक : अंधश्रद्धेचा वापर करुन महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशोकचे अनेक घोटाळे समोर आले असून आता त्याची शैक्षणिक पात्रता समोर आली आहे. यामध्ये तो गणितामध्ये नापास असल्याची बाब समोर आली आहे. (Crime News) विशेष म्हणजे अंकशास्त्राचा दावा करुन लोकांच्या भविष्याची गणितं मांडणारा हा भोंदूबाबा मात्र गणितामध्ये नापास झाला आहे. याचबरोबर अशोक खरात (Ashok Kharat) याने आपले नावही बदलले असल्याचे देखील समोर आले आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सात गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल करण्यात आले. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज्यातील सनदी अधिकारी आणि बड्या नेत्यांसोबत त्याचे घरचे संबंध होते. पोलिसांच्या हाती लैंगिक अत्याचार करतानाचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ आहेत. तसेच त्याचे राजकीय नेत्यांसोबत वैयक्तिक संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय

अशोक खरातचे दहावीचे गुण समोर आले आहेत. भोंदूबाबा अंकांच्या जोरावर लोकांचे भविष्य मांडत होता आणि फसवत होता. मात्र तो स्वतः गणिताच्या पेपरमध्ये नापास असल्याचे समोर आले आहे. दहावीमध्ये अशोक खरातला गणितामध्ये केवळ 28 गुण असल्याचे समोर आले आहे. तसेच इतर विषयांमध्ये सुद्धा तो काठावर पास झाला होता. दहावीमध्ये त्याची एकूण टक्केवारी ही सरासरी 35 टक्के होती. त्यामुळे अशोक खरातकडे शैक्षणिक पात्रता नसल्याचे देखील समोर आले आहे.
त्याचबरोबर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने त्याचे नाव बदलले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचे खरे नाव हे लक्ष्मण होते. त्याने खरं नाव बदलून त्याच नाव अशोक कुमार करुन घेतलं. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथे त्याचे शिक्षण झाले होते. अंकशास्त्राच्या थापा मारणाऱ्या अशोक खरातची त्याच्या दहावीच्या मार्कांनी पोलखोल केली आहे.

हे देखील वाचा : रूपाली चाकणकरांचा पाय खोलात? Ashok Kharat प्रकरणात थेट…

५ जिवंत काडतुसे सापडली

अशोक खरातवर वन्यजीव शिकार प्रकरणाचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्याने हरणाची शिकार करून ‘कस्तुरी’ नावाने काही पदार्थ लोकांना दिला आहे. या सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे. अशोक खरात हा भक्तांना साप, वाघ दाखवायचा अशी माहितीही तपासामध्ये समोर आली. पोलिस कोठडीची मागणी करताना सरकारी वकिलांनी याचा उल्लेख केला. अशोक खरातने बोटात घालायचे खडे कुठून आणले? मिश्रित पाणी कुठून आणले? याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडे 5 जिवंत काडतुसेही सापडले आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

Web Title: Ashok kharat educational background failed in mathematics in 10th standard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?
1

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा
2

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा

Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई
3

Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया
4

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.