पुणे : पुण्यातील कसबा (Kasba Bypoll) आणि चिंचवड (Chinchwad by election) पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची चिंचवड व कसब्यातील निवडणुकीला रंग देण्यात आला होता. मात्र कसब्यात मविआचे, काँग्रेसचे उमेदवावर रवींद्र धंगेकर ही अकरा हजारापेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर आता चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा 36,070 मतांनी विजय झाला आहे. जगताप यांना एकूण 1,35,494 मते मिळाली आहेत, नाना काटेंना (Nana Kate) 99,424 मते मिळाली आहेत, तर राहुल कलाटेंना (Rahul Kalate) 40,075 आतापर्यंत एकूण मते मिळाली आहेत.
बंडखोरी व अपक्षामुळं मविआचा पराभव…
दरम्यान, ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी व मविआचे उमेदवार नाना काटे यांना तिकिट देण्यात आले, मात्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला, त्यामुळं येथे मतांचे ध्रुवीकरण झाले, परिणामी मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपाच्या उमेदवाराला झाला. जर येथे बंडखोरी झाली नसती तर, कदाचित चित्र वेगळे असते. कारण राहुल कलाटे व नाना काटे यांच्या मतांची बेरीज केल्यास भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्यापेक्षा अधिक मतं होतात. पण बंडखोरीमुळं मविआचा पराभव झाला हे मात्र नक्की.
एकूण मिळालेली मतं
भाजपा – अश्विनी जगताप – 1,35,494
राष्ट्रवादी काँग्रेस – नाना काटे – 99,424
अपक्ष (बंडखोर) – राहुल कलाटे – 40,075
जगताप यांची जमेची बाजू व सहानुभूतीचा फायदा
चिंचवड मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झालं आहे. तसेच या ठिकाणी भाजपा पक्षापेश्रा जगताप कुटुंबाचे काम मोठे आहे. लक्ष्मण जगताप यांनी लोकांची वैयक्तिक कामे केली आहेत, त्यामुळं या ठिकाणी आश्विनी जगताप या जिंकून आल्या, तसेच येथे पतीच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळाली, त्याचे रुपातंर मतदानात झाल्यामुळं जगताप या निवडूण आल्या. ही भाजपाचे व जगताप यांची जमेची बाजू असल्याचा फायदा झाला.
निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची…
निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. मतदानाच्या आधी सर्वचं पक्षातील दिग्गज नेते चार-पाच दिवस तळ ठोकूण पुण्यात होते. त्यामुळे येथे काँटे की टक्कर पाहयला मिळाली.