Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला वनरक्षकावर ठेकेदाराचा हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं ?

दौंड तालुक्यातील वरवंड येथे वनविभागाच्या वनक्षेत्रांमध्ये बेकायदा जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू होते. ते काम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास ठेकेदार अमोल भोईटे व इतर दोन व्यक्तींनी शिवीगाळ व धक्काबुकी करत हल्ला केल्याची घटना घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2024 | 10:33 AM
महिला वनरक्षकावर ठेकेदाराचा हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं ?
Follow Us
Close
Follow Us:
पाटस : दौंड तालुक्यातील वरवंड येथे वनविभागाच्या वनक्षेत्रांमध्ये बेकायदा जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू होते. ते काम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास ठेकेदार अमोल भोईटे व इतर दोन व्यक्तींनी शिवीगाळ व धक्काबुकी करत हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन व्यक्तींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पोपटराव भोईटे (रा.पाटस ता. दौंड), ढमाले व इतर एक अनोळखी व्यक्ती (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील वरवंड वन परिमंडल कार्यक्षेत्रातील वरवंड हद्दीतील वनक्षेत्र (गट नं १९२२ ) मध्ये गुरुवारी (दि २९) वनरक्षक शितल गंगाराम मेरगळ व  वनमजुर अरूण बापुराव मदने हे पेट्रोलींग करीत असताना दुपारी ३ वाजण्याच्या आसपास वनक्षेत्रांमध्ये एक जेसीबी मशीन जलवाहिनीची चारी खोदताना निदर्शनास आले. तेथे जाऊन चारीची पाहीणी केली असता त्या ठिकाणी दोन जलवाहिनी च्या चारीचे खोदकाम काम सुरू असल्याचे दिसून आले.
वनरक्षक मेरगळ यांनी काम करीत असलेल्या कामगारांना विचारणा केली असता, त्यांनी ठेकेदार अमोल भोईटे यांना  घटनास्थळी बोलावून घेतले. ठेकेदार भोईटे यांना सदर खोदकामाबाबत विचारणा केली असता, त्यांनी  वरंवड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी असून काळ्या रंगाची जलवाहिनी ही वरवंड गावाची असून पांढरा रंगाची ही वाखरी ग्रामपंचायत गावची आहे, असे सांगितले.
फक्त वरवंड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी  वनविभागाची रितसर परवानगी असून तुम्ही वाखरी गावाची जलवाहिनीचे काम कसे करता, त्यासाठी वाखरी गावचे जलजीवन मिशन योजनेचे काम करण्याचा वनविभागाचा परवाना आहे का ?  वनविभागाची एका गावासाठी परवानगी असताना दुसऱ्या गावासाठी बेकायदा काम कसे करता ते काम थांबवा, असे सांगत जेसीबी मशीन ( क्र. एम. एच. १२ व्हि.एल. ५३७५ ) जप्त करुन दौंड वनविभागाच्या कार्यालयात घेऊन जाण्यासाठी जात असताना त्याठिकाणी ढमाले नावाचा व्यक्ती आणि ठेकेदार अमोल भोईटे यांचा भाचा आले आणि त्यांनी  जेसीबी मशीन घेऊन जाण्यासाठी मज्जाव केला.
तसेच ढमाले यांनी तुम्ही मला पैसे मागितले, अशी तुमची खोटी तक्रार करतो व तुम्ही एकटे फिरता मी तुम्हाला काहीही करू शकतो, अशी धमकी दिली तसेच ठेकेदार अमोल भोईटे यांनी धक्काबुक्की करून शिवागाळ करीत जेसीबी मशीन घेऊन पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
वनरक्षक शितल मेरगळ यांनी याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ठेकेदार अमोल भोईटे, ढमाले व ठेकेदार भोईटे यांचा भाचा यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करणे शिवीगाळ व धक्काबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार भानुदास बंडगर हे करीत आहेत.

Web Title: Attack on female forest guard by contractor case registered against 3 persons what exactly happened nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 10:32 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Patas

संबंधित बातम्या

आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?
1

आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
2

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक

घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video
3

घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
4

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.