पिंपरी : औरंगाबाद कोर्टाकडून फौजदारी दाव्यामध्ये बजाज ॲटो ली कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नावे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत बजाज ऑटो ली. कंपनी निगडी येथे घडला. या प्रकरणी उमेश वासुदेव भंगाळे (वय ३६, रा. मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रभाकर विठ्ठलराव मानकर (रा. औरंगाबाद) याच्यासह त्याला साथ देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज कंपनीतील सेक्रेटरी एमडी मॅनेजर लिगल सेक्शन प्रसिडेंट प्रर्चेस डिपार्टमेंट व प्रिसिडेंट अकाऊंड फायनान्स बाजाज ली. यांच्या नावाने समन्स प्राप्त झाले होते. या समन्सद्वारे अधिकाऱ्याला ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या वेबसाईटवर पडताळणी केली असता तसेच न्यायालयात अर्ज केला असता असे कोणतेही समन्स न्यायालयाने दिले नसल्याचे निदर्शनास आले.
[read_also content=”पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/take-strict-action-against-those-raising-pakistan-zindabad-slogans-nana-patole-nrdm-329337.html”]
आरोपी प्रभाकर मानकर व इतर व्यक्तींनी संगमत करून न्यायालयाचे खोटे शिक्के, सील वापरून औरंगाबाद न्यायालयाचे नाव वापरून खोटे समन्सद्वारे धमकी देत पैसे उकळण्याचा प्रयत्न करून कंपनीची बदनामी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.