
Crime News: अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; 1 कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त
मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई
मुंबई नाशिक महामार्गावर कारवाई
1 कोटींचा मुद्देमाल केला जप्त
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुंबई – नाशिक महामार्ग, सोनाळे गावच्या हद्दीत एच.पी पेट्रोल पंपाजवळ (ता. भिवंडी) परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 27 जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की ब्रॅण्ड मद्याचे 1400 बॉक्स अर्थात 180 मि.ली क्षमतेच्या 67 हजार 200 बाटल्या दारूबंदी कायद्यातंर्गत जप्त करण्यात आल्या. तसेच आयशर कंपनीच्या एमएच 04 एलवाय 4133 क्रमांक असलेल्या सहाचाकी वाहनासह, एक मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 72 लाख 94 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Crime News) करण्यात आला.
या कारवाईत श्रवणकुमार कृष्णराम पंवार, रा. सगडवा, पो. डावल, ता. चीतलवाना, जि. जालोर (राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे यांच्या कारवाईच्या दिलेल्या निर्देशानुसार व दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, दुय्यम निरीक्षक एच. बी यादव, सहायक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, तसेच जवान हुनमंत गाढवे, हर्षल खरबस, अमीत सानप, श्रीराम राठोड, कुणाल तडवी, सागर चौधरी यांचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट करीत आहे, असे विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यांनी कळविले आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तरुण व्यवसायिकाला धमकी
पिंपरी शहरातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. तरुण व्यावसायिकाला बिश्नोई टोळीच्या नावाने तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सलग दोन दिवस या व्यापाऱ्याला धमकीचे कॉल येत होते. हे कॉल परदेशी VPN वापरून केल्याने कॉलचा उगम शोधणे कठीण झाले आहे. धमकी देणाऱ्यांनी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित फरार गुन्हेगारांची नावे घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
5 कोटी रुपये द्या, नाहीतर…; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तरुण व्यवसायिकाला धमकी
घाबरलेल्या व्यापाऱ्याने अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंद होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे. कॉलची सत्यता, टोळीशी असलेला संबंध आणि तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सायबर तज्ज्ञांसह चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात कॉल परदेशातील एका ओळखीच्या बेटावरील लोकेशनवरून आल्याचे संकेत मिळाले असून, प्रकरणाला आंतरराष्ट्रीय डिजिटल गुन्हेगारीचा धागा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.