दौंड : पाटस येथील पत्रकार राजेंद्र झेंडे यांचा पत्रकारितेत केलेल्या कामाची दखल घेत होळकर घराण्याचे थेट वंशज भूषणसिंह राजे होळकर व दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दौंड संभाजी ब्रिगेडच्या वतीने रविवारी (दि. १६) विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार झेंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे पाटील, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश पासलकर, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर आदी उपस्थित होते.