Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray Brothers Alliance: ‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शवत दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर ठाकरे बंधुंनी विजयी सभा घेणार असल्याचे घोषित केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 02, 2025 | 09:53 AM
Thackeray Brothers Alliance: ‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणाचा निर्णयावरून चांगलच रान तापलं होतं. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत या हिंदी सक्तीला टोकाचा विरोध केला. मनसे आणि ठाकरे गटाच्या आक्रमकतेपुढे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. हिंदी सक्तीविरोधात येत्या ५ जुलैला मनसे आणि ठाकरे गटाची विजयी सभा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध केली आहे.

येत्या पाच जुलैला वरळी डोममध्ये तब्बल १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधु एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मराठीचा आवाज या घोषणेसह खासदार संजय राऊत यांनी या सभेची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेची सभा ऐतिहासिक सभा असणार आहे. पण त्याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मनसेचं अस्तित्त्व धोक्यात येईल, असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर भाजपने मात्र राज आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Todays Gold-Silver Price: तब्बल 3 हजार रुपयांनी वाढल्या 24 कॅरेट सोन्याच्या किंमती, काय आहेत आजचे दर? जाणून घ्या

राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शवत दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर ठाकरे बंधुंनी विजयी सभा घेणार असल्याचे घोषित केली. पण या सभेनंतरही आगामी महापालिका निवडणुकीत ही वज्रमुठ कायम राहणार की दोघांच्या वाटा वेगळ्या होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महापालिका निवडणुकीत मनसे-ठाकरे युती झाल्यास फायदा कुणाला?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शिवसेनेच्या मूळ वारशातून तयार झालेले नेते. गेल्या काही वर्षांपासू राज आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, आणि मुंबईसह राज्यभरात आपली सत्ता स्थापन करावी, अशी मागणी होताना दिसत आहे. येत्या पाच जुलैला होणाऱ्या सभेकडे त्यांच्या चाहते अपेक्षेने पाहत आहे. खरंतर, गेल्या दोन दशकांपासून दोघांची राजकीय वाटचाल वेगवेगळी झाली असली, तरी सध्या हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ते पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. या संभाव्य युतीमुळे दोघांच्याही पक्षांना काही विशिष्ट राजकीय फायदे होण्याची शक्यता आहे.

पोटाचा सुटलेला घेर कमी करण्यासाठी जेवणानंतर खा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात वितळून जाईल पोटावर वाढलेली चरबी

१. मराठी मतदारांचे एकत्रीकरण
मराठी अस्मितेचा मुद्दा हा दोघांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे जर राज आणि उद्धव एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक मजबूत होऊ शकतो.

२. मनसेला नवसंजीवनी
गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या राजकीय ताकदीत घट झाली आहे. शिवसेनेसोबत युती झाल्यास मनसेला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.

३. शिवसेनेची मुंबई-पुण्यात पकड मजबूत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरी भागांमध्ये आधीपासूनच आधार आहे. राज ठाकरे यांची शैली आणि भाषणकौशल्य यामुळे तरुणांमध्ये आकर्षण आहे. हे दोघं एकत्र आल्यास महानगरांमध्ये शिवसेनेची पकड आणखी बळकट होऊ शकते.

४. भाजप-शिंदे गटासाठी आव्हान
या युतीमुळे भाजप आणि शिंदे गटाला महानगरपालिका निवडणुकांमध्ये थेट आव्हान उभं राहू शकतं. विशेषतः मुंबई महापालिकेसाठी ही युती निर्णायक ठरू शकते.

 

Web Title: Awaz marathicha thackeray brothers reunite after 19 years states focus on historic meeting in worli on july 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • raj thackeray
  • Thackeray Brothers Alliance
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
3

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.