Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रसिकांना मंत्रमुग्ध करणार ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’; ‘नवराष्ट्र’च्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त संगीतमय मेजवानी

'दै. नवराष्ट्र' यंदा 24 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. यानिमित्त गुरुवारी 31 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात 'चला दोस्तहो... आयुष्यावर बोलू काही' या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2023 | 10:20 AM
रसिकांना मंत्रमुग्ध करणार ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’; ‘नवराष्ट्र’च्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त संगीतमय मेजवानी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : ‘दै. नवराष्ट्र’ यंदा 24 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. यानिमित्त गुरुवारी 31 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात ‘चला दोस्तहो… आयुष्यावर बोलू काही’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन आहे. एस. के. एज्युकेशन कंसल्टंसी, ‘नवभारत नवराष्ट्र’ व लक्ष्मी बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम नागपूरकरांसाठी संगीतमय मेजवानीच ठरणार आहे.

गेली 20 वर्षे डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही लोकप्रिय जोडी रसिकांना आयुष्यावर बोलू काही या कविता, गाण्यांच्या मैफिलीला पुन्हा पुन्हा खेचून आणते आहे. आजच्या या तांत्रिक युगात मराठी कविता गाण्यांच्या या मैफिलीला ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड पाहायला मिळणारा असा हा एकमेव कार्यक्रम ठरला आहे.

मराठी गीतांसह रंगणार सायंकाळ

संदीप खरे, डॉ. सलील कुलकर्णी यांची जोडी पुन्हा एकदा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. त्यांना आदित्य आठल्ये आणि रितेश ओहोळ साथ देतील. ‘मुंगी बाई मुंगी बाई, सिमेंटच्या या जगतात, कुठून मिळतो गं तुला मार्ग’, ‘देवा मला रोज एक…’, ‘चला जरा हळूहळू…’, ‘दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का मेठेपणी बाबा तुला आठवेल का ‘सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये यासारखे प्रेमगीत, बालगीत, चित्रपटाती गाण्यांची सुमधूर संध्या गुरुव नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.

अभूतपूर्व ठरणार सोहळा

या जोडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे रसिक किमान 50 ते 100 वेळा येऊन गेलेले असतात. चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, ना मंजूर, दमलेल्या बाबाची गोष्ट. स्पायडर मॅन, मुंगी बाई, सारख्या असंख्य प्रकारच्या (प्रेम गीते, बालगीते, सिनेमातील गीते) कविता ही पाठ असतात. तरीही आजच्या कार्यक्रमात आपल्याला नवीन काहीतरी ऐकायला मिळणार याची त्यांना खात्री असते. कारण ही मंडळी कविता गाण्याच्या रूपात जे दान त्यांच्या ओंजळीत देणार असते. ते खूप अभूतपूर्व ठरते आणि एखादा नवीन रसिक जेव्हा या कार्यक्रमाला प्रथम हजेरी लावतो.

तो पुढच्या वेळी परत येईलच हे स्वतःच्या मनाशी ठरवून बाहेर पडतो. सतत सोशल मीडियावर उपस्थित राहणा तो रसिक मात्र त्याच सोशल मीडियाला आणि स्वतःला काही तास विश्रांती देऊन आयुष्यावर बोलू काहीला हजेरी लावतो. त्यावरूनच या कार्यक्रमाची उंची आणि त्याचा दर्जा लक्षात येतो.

हे आहेत कार्यक्रमाचे सहयोगी

झिरो डिग्री लाउंज, विको आणि व्हेइकल पार्टनर बीगॉस ईव्ही (अरोरा ऑटोटेक नागपूर) कार्यक्रमाचे सहयोगी आहेत. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवेशासाठी निशुल्क प्रवेशिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिक माहिती व कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी 8180005300 आणि 7709355553 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Web Title: Ayushyavar bolu kahi show will be organized on navarashtra foundation day in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 10:20 AM

Topics:  

  • maharashtra
  • sandip deshpande

संबंधित बातम्या

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा
1

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
2

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
3

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
4

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.