
टोळीप्रमुख आकाश वसंत कंचीले (रा. लक्ष्मीनगर, येरवडा – सध्या फरार) याच्यासह त्याचे साथीदार दिनेश रामदास घाडगे (वय २५, रा. कोंढवा खुर्द), कार्तिक महादेव पांडागळे (वय १९, रा. कोंढवा खुर्द), विजय रामदास चौंधे (वय १८, रा. येवलेवाडी, कोंढवा बु.), जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव (वय २२, रा. अंतुलेनगर, येवलेवाडी), लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या शिवाजी गजरमल (वय २६, रा. येरवडा/सध्या कोंढवा खुर्द), प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम (वय २६, रा. येरवडा), धम्मा शशिकांत साळवे (वय २०, रा. अंतुलेनगर, पिसोळी – फरार) आणि आर्यन थोरात (फरार) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहिहंडी उत्सवादरम्यान पिस्तूलाचा वापर करत दहशत पसरवली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान टोळीप्रमुख आकाश कंचीले व त्याच्या इतर चार साथीदारांवर येरवडा, कोंढवा, लोणी काळभोर व विमानतळ पोलिस ठाण्यांत यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी या टोळीवर मकोका कायद्यान्वये कारवाईचा बडगा उगारला आहे. यातील टोळीप्रमुखासह तिघे जण अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले, संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रवींद्र गावडे, शेखर कोळी आणि पोलिस अंमलदार एकोर्गे, चव्हाण, माने यांच्या पथकाने केली आहे.
Ans: दहिहंडी उत्सवादरम्यान पिस्तुलाचा वापर करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी कुख्यात कंचीले टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Ans: आकाश वसंत कंचीले हा टोळीचा प्रमुख असून, त्याच्यासह एकूण नऊ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Ans: दहिहंडी उत्सवादरम्यान पिस्तुलाचा वापर करून दहशत पसरवणे तसेच टोळीतील सदस्यांवर यापूर्वी येरवडा, कोंढवा, लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.