Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस पक्षाची ‘या’ तारखेला ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’; सपकाळांसह बडे नेते होणार सहभागी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ आयोजित केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2026 | 04:43 PM
काँग्रेस पक्षाची 'या' तारखेला ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’; सपकाळांसह 'हे' बडे नेते होणार सहभागी

काँग्रेस पक्षाची 'या' तारखेला ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’; सपकाळांसह 'हे' बडे नेते होणार सहभागी

Follow Us
Follow Us:
  • २६ नोव्हेंबरला ठाण्यात काँग्रेसची राज्यस्तरीय संविधान बचाव रॅली
  • हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार
  • संविधान, लोकशाही आणि मतदानाचा अधिकार जपण्यासाठी रॅलीचे आयोजन
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

 

काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत निवडणूक आयोगालाही कठपुतली बाहुली बनवले आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार एसआयआरच्या माध्यमातून काढून घेण्याचे काम भाजपा निवडणुक आयोगाच्या मदतीने करत आहे. मतचोरी व निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभारास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार जबाबदार आहेत, ते भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होत नाहीत.  ‘अब की बार, ४०० पार’चा नारा देत संविधान बदलण्याचे भाजपाचे मनसुबे जनतेने निवडणुकीत हाणून पाडले. आता डिलिमिटेशन आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा सर्व कारभार हुकूमशाहीचा आहे. देशाचे संविधान वाचवणे ही आजची गरज असून काँग्रेस पक्षाने संविधानाच्या रक्षणासाठी देशव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाने लोकशाही व संविधान रक्षणासाठी वारंवार आंदोलने केली आहेत. संविधानाने दिलेली लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे जपण्यासाठी तसेच संविधानाच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रसने या रॅलीचे आयोजन केले आहे.

हे सुद्धा वाचा : इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

संविधान बचाव रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सहप्रभारी, खासदार, आमदार, लोकसभा व जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, लोकप्रतिनिधी सर्व फ्रंटल, सेल व विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.

हे सुद्धा वाचा : जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा

💡

Frequently Asked Questions

  • Que: संविधान बचाव रॅली कधी आणि कुठे आयोजित करण्यात आली आहे?

    Ans: संविधान दिनानिमित्त गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय संविधान बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: संविधान बचाव रॅलीमध्ये कोणते प्रमुख नेते सहभागी होणार आहेत?

    Ans: महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

  • Que: काँग्रेसने संविधान बचाव रॅलीचे आयोजन का केले आहे?

    Ans: लोकशाही, संविधान, मतदानाचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्यासाठी तसेच संविधानाच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने या रॅलीचे आयोजन केले आहे.

Web Title: The congress party has organized a state level save the constitution rally in thane nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra

संबंधित बातम्या

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र
1

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये
2

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

Amravati News: मेळघाटात पक्ष्यांच्या १८ प्रजातींची नोंद! तारूबांदा परिसरात वनविभागाची मोहीम; जैवविविधतेची समृद्धी
3

Amravati News: मेळघाटात पक्ष्यांच्या १८ प्रजातींची नोंद! तारूबांदा परिसरात वनविभागाची मोहीम; जैवविविधतेची समृद्धी

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे
4

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.