Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी मी अर्थमंत्री होणार, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू आहेत, असे म्हटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2026 | 10:02 AM
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, 'पक्षाचे...'

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, 'पक्षाचे...'

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याबाबत दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील. त्यांचा निर्णय झाल्यावर तो सर्वांनाच कळेल, असे संकेत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

पंढरपूर येथे ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकार पुन्हा एकदा मतदारसंघ रचनेबाबत विधेयक आणण्याच्या तयारीत असून हे होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणण्याबाबत काही हालचाली सुरू असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. दरम्यान, अर्थमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली असून, यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी मी अर्थमंत्री होणार, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेतील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता; अनेक मुद्यांवरून विरोधक करणार सरकारला लक्ष्य

अर्थमंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी संबंधितांशी बोलत असतील तर मला माहित नाही. मात्र, ज्यावेळी त्याचा निर्णय होईल तेव्हा तो सर्वांनाच कळेल. राजकारणात उद्या नेमके काय घडेल हे कधीच आधी सांगता येत नसते. त्यामुळे थोडी वाट पाहू आणि चांगलेच ऐकायला मिळेल, असे सूचक संकेतही त्यांनी यावेळी दिले.

सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांसोबत घेतला महाप्रसाद

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंढरपूर दौऱ्यादरम्यान आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नवीन भक्त निवास इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासही त्या उपस्थितीत होत्या. भक्तनिवास परिसरात आयोजित वारकऱ्यांच्या भक्ती पंगतीमध्ये वारकऱ्यांनी केलेल्या आग्रहाचा मान राखत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यासोबत पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांच्या या साधेपणाच्या आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या आदराच्या भावनेचे उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केले.

Web Title: Will the two ncp factions come together what did dilip walse patil say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

‘विरोधक केवळ राम मंदिरावरून राजकारण करतायत’; शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना
1

‘विरोधक केवळ राम मंदिरावरून राजकारण करतायत’; शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…
2

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.