Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

बदलापूर नगरपालिकेत रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदावर शिवसेनेतून भाजपामध्ये आलेल्या प्रवीण राऊत यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 05, 2026 | 06:09 PM
Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

Follow Us
Close
Follow Us:
  • बदलापुरातील राजकारणात झाली उलथापालथ 
  • बदलापुर नगरपालिकेत रिक्त स्वीकृत नगरसेवक जाहीर
  • शिवसेनेतून भाजपात आलेल्या प्रवीण राऊत यांची वर्णी 
 

Badlapur Politics News: बदलापूर नगरपालिकेत रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदावर भाजपाकडून प्रवीण राऊत यांना संधी देण्यात आली आहे. बुधवारी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नुकतेच शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केलेले प्रवीण राऊत यांना भाजपाने स्वीकृत नगरसेवकपद दिले आहे. भाजपाने यापूर्वी स्वीकृत नगरसेवकपदी तुषार आपटे यांची नियुक्ती केली होती, मात्र दोन वर्षांपूर्वी बदलापुरात घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहआरोपींमध्ये आपटे यांचेही नाव असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून भाजपावर टीकेची झोड उठली होती.

Karjat News : किरण ठाकरे यांच्याकडून 250 कोटींची विकास कामे, माणगावतर्फे वारेडीच्या विकासाचा दावा

अखेर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. हे स्वीकृत नगरसेवकपद आपटे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाले होते. दुसरीकडे शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपद मिळेल अशी अपेक्षा राऊत यांना होती, मात्र शिवसेनेने स्वीकृत नगरसेवक पदापासून डावलल्यामुळे प्रवीण राऊत यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

या दरम्यान भाजपाने नाराजीचा फायदा घेत प्रवीण राऊत यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन स्वीकृत नगरसेवक केले आहे. बुधवारी प्रवीण राऊत यांनी स्वीकृत नगरसेवकपद स्वीकारले, विशेष म्हणजे यावेळी त्यांची पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल राऊतदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. यावेळी प्रवीण राऊत त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत ढोलताशांच्या गजरात पालिकेसमोर जल्लोष साजरा करत जंगी मिरवणूक काढली होती. यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांका दामले, भाजपाचे गटनेते शरद तेली, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यासह नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

मागील २५ वर्षांपासून शिवसेनेचे काम करत होतो, मात्र शिवसेनेच्या प्रस्थापित नेतृत्वाने दुय्यम स्थान दिले, हे मी वारंवार सांगितले आहे. माझे विचार समजण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते भाजपा. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवीण राऊत यांनी दिली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Badlapur politics pravin raut gets bjp nominated corporator post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल
1

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.