Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Water Project: जे पाणी शहरात पोहोचलेच नाही, त्यावरून महापौर-मंत्री आमनेसामने! सूर्या प्रकल्पातील १२ एमएलडी पाण्यावरून वाद

Surya Water Project: सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातील शिल्लक १२ एमएलडी पाणी ठाणे शहराला देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. हे पाणी अद्याप मिरा-भाईंदर शहरात पोहोचलेले नसताना ते ठाण्याला देण्याच्या हालचालींना महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाम विरोध दर्शवला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2026 | 04:24 PM
जे पाणी शहरात पोहोचलेच नाही, त्यावरून महापौर-मंत्री आमनेसामने! सूर्या प्रकल्पातील १२ एमएलडी पाण्यावरून वाद

जे पाणी शहरात पोहोचलेच नाही, त्यावरून महापौर-मंत्री आमनेसामने! सूर्या प्रकल्पातील १२ एमएलडी पाण्यावरून वाद

Follow Us
Follow Us:
  • जे पाणी अद्याप शहरात पोहोचलेच नाही, त्यावरून महापौर आणि मंत्री आमनेसामने!
  • सूर्या प्रकल्पातील शिल्लक १२ एमएलडी पाणी ठाण्याला देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष
  • महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांचा ठाम विरोध
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून पाणी मिळण्याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नसतानाच आता या पाण्याच्या वाटपावरून राजकीय घमासान सुरू झाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १३ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या एका पत्रात सूर्या प्रकल्पातून मीरा-भाईंदरला मिळणारे पाणी आणि प्रकल्पातील शिल्लक पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावर बैठक आयोजित करण्याचा उल्लेख केला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. (Surya Water Project)

या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना घेरले आहे. मीरा-भाईंदरच्या हक्काचे एक थेंबही पाणी ठाण्याला जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देत बैठकीचा उद्देश मीरा-भाईंदरला लवकरात लवकर सूर्या प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देणे हा असल्याचे स्पष्ट केले. तसेच मेहता नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

PSI Bribe: गुन्ह्यात सहआरोपी करीन… भीती दाखवून मागितले २५ हजार; लाच घेतानाच PSI शरद खाडे थेट एसीबीच्या जाळ्यात!

काय आहे पाण्याचे गणित?

सूर्या धरण प्रकल्पातून एकूण ४१५ एमएलडी पाणी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. यापैकी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पुढील वर्षी २१८ एमएलडी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेसाठी १८० एमएलडी आणि ४४ गावांसाठी १५ एमएलडी पाणी निर्धारित करण्यात आले आहे.

वसई-विरार शहराला २०२४ पासून या प्रकल्पाचे पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे एकूण ४०३ एमएलडी पाण्याचे वाटप प्रस्तावित असून, सुमारे १२ एमएलडी पाणी शिल्लक राहते. मात्र, या वादाचा केंद्रबिंदू मीरा-भाईंदरसाठी निर्धारित २१८ एमएलडी पाणी नसून, प्रकल्पातील निर्धारित वाटपानंतर शिल्लक राहणाऱ्या १२ एमएलडी पाण्याच्या वापराबाबत आहे.

महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता आक्रमक

महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले की, प्रताप सरनाईक हे मीरा-भाईंदरचेही प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत शहराच्या हक्काचे पाणी ठाण्याला देण्याचा विचार होणे दुर्दैवी आहे. शहरातील नागरिकांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार नरेंद्र मेहता यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत मीरा-भाईंदरच्या वाट्याचे पाणी ठाण्याला नेऊ दिले जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांचा पलटवार

दुसरीकडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापौर आणि आमदारांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सांगत पलटवार केला आहे. शहरातील चेनच्या पाण्याच्या टाकीच्या कामात ७११ कंपनीकडून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील तीन महिन्यांत मीरा-भाईंदरला २१८ एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असा दावाही त्यांनी केला. नागरिकांना लवकरात लवकर पाणी मिळावे, हाच बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा!

या संपूर्ण वादातील सर्वात महत्त्वाची आणि चिंताजनक बाब म्हणजे ज्या पाण्याच्या वाटपावरून लोकप्रतिनिधी आमनेसामने आले आहेत, ते पाणी अद्याप मीरा-भाईंदरमधील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेलेच नाही. २०१३ पासून कागदावर आकार घेत असलेल्या या प्रकल्पाबाबत २०१७ मधील महानगरपालिका निवडणुकीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भाईंदरला सूर्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तीन वर्षांची मुदतही सांगण्यात आली होती. मात्र, पाहता पाहता दहा वर्षांहून अधिक काळ उलटला तरी शहरातील नागरिकांना या प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे.

राजकीय श्रेयवादापेक्षा नागरिकांना पाणी कधी मिळणार, हा खरा प्रश्न!

सूर्या प्रकल्पाच्या पाण्यावरून सध्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. एकीकडे महापौर आणि आमदार शहराच्या हक्काच्या पाण्याबाबत ठाम भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे परिवहन मंत्री पुढील तीन महिन्यांत २१८ एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचा दावा करत आहेत.

मात्र, या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे मीरा-भाईंदरकरांना प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कधी पूर्ण होणार आणि शिल्लक १२ एमएलडी पाण्याबाबत अंतिम निर्णय काय होणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या पाण्यावरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांना मात्र आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष नळातून पाणी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Dadar Station Renaming : दादर स्टेशनच्या नामांतराविरोधात मनसेनंतर ठाकरे गटही मैदानात! आमदार महेश सावंत यांनी मांडली भूमिका

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्या प्रकल्पातील किती एमएलडी पाण्यावरून वाद निर्माण झाला आहे?

    Ans: सूर्या प्रकल्पातील शिल्लक १२ एमएलडी पाणी ठाणे शहराला देण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे.

  • Que: ठाण्याला पाणी देण्याच्या प्रस्तावाला कोणी विरोध केला आहे?

    Ans: मिरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.

  • Que: या पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून वाद का निर्माण झाला आहे?

    Ans: सूर्या प्रकल्पातील पाणी अद्याप मिरा-भाईंदर शहरात पोहोचलेले नसताना त्यातील शिल्लक १२ एमएलडी पाणी ठाण्याला देण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे.

Web Title: Surya project 12 mld water allocation thane mayor dimple mehta narendra mehta opposition sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • thane
  • water

संबंधित बातम्या

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत चार आत्महत्यांच्या घटना; तीन विवाहित महिलांसह १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
1

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत चार आत्महत्यांच्या घटना; तीन विवाहित महिलांसह १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

Thane News: कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणे शहर विठ्ठलमय; मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, भजन-कीर्तनाचे आयोजन
2

Thane News: कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणे शहर विठ्ठलमय; मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, भजन-कीर्तनाचे आयोजन

Mumbai Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणकरांचा प्रवास होणार सुसाट! कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो दाखल; प्रवासी सेवेकडे महत्त्वाचे पाऊल
3

Mumbai Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणकरांचा प्रवास होणार सुसाट! कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो दाखल; प्रवासी सेवेकडे महत्त्वाचे पाऊल

Maharashtra State Open : हर्षित महिमकरची दुहेरी मुकुटाला गवसणी! स्पृहा जोशी, अन्विषा घोरपडेही ठरल्या विजेत्या
4

Maharashtra State Open : हर्षित महिमकरची दुहेरी मुकुटाला गवसणी! स्पृहा जोशी, अन्विषा घोरपडेही ठरल्या विजेत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.