Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: अंधश्रद्धेचा आरोप की सत्तेचा गैरवापर? महिला आयोग वादाच्या भोवऱ्यात

महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचा वलग्ना करणारे सत्ताधारी हेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याची शंका नव्हे तर विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 23, 2026 | 12:25 PM
Ashok Kharat Case: अंधश्रद्धेचा आरोप की सत्तेचा गैरवापर? महिला आयोग वादाच्या भोवऱ्यात

Ashok Kharat Case: अंधश्रद्धेचा आरोप की सत्तेचा गैरवापर? महिला आयोग वादाच्या भोवऱ्यात

Follow Us
Follow Us:
  • पाठराखणीसाठीच महिला आयोग का?
  • महिला आयोग अध्यक्षांवर प्रश्नचिन्ह
  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी
 

Rupali Chakankar News: महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचा वलग्ना करणारे सत्ताधारी हेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याची शंका नव्हे तर विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. राज्य महिला आयोग महिलांचे शोषण रोखण्यासाठी की, लाडक्या बहिणींवर बलात्कार करणारांची पाठराखण करण्यासाठी? असा प्रश्न निर्माण झाला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या भोंदू तांत्रिक बाबा खरात सोबतचे व्हिडीओ समाज माध्यमातून, वृत्तवाहिन्या मधून जनसामन्यात पसरत असताना धर्मांध सत्ताधारी मात्र या प्रश्नी मूकगिळून बघायची भुमीका घेत आहे.

Russia Oil Exports: रशियाला युद्धातून झाला अब्जावधीचा नफा; तेल बाजारपेठ विस्तारली

अंधश्रद्धेत लिप्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरही तत्काळ कारवाई करावी, यासाठी जनवादी महिला संघटना व बीड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने धारूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात तथाकथित भोंदू तांत्रिक अशोक खरात याचे काळे कारणामे महाराष्ट्रासमोर उघड झाले आहेत. आणखी होत आहेत. विद्यमान काळात ही राजाश्रेयाने महिलांचे अश्लाघ्य शोषण सुरू असणे ही शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. अघोरी कृत्य व महिलांचे शोषण करणारा हा भोंदू जरी गजाआड गेला असला तरी यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत असलेल्या मंडळींनी अशा प्रवृत्तीला ठेचून काढावे, अशी मागणी केली आहे.

LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; आता फक्त ‘इतकाच’ गॅस मिळणार, दरांमध्येही एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर

तत्काळ चौकशी करा सोबतच राज्य महिला आयोगाच्या खुर्चीवर विराजमान असणाऱ्या रूपालीबाई चाकणकर या भोंदू बाबाच्या ट्रस्टच्या सदस्या तसेच पाठीराख्या असल्याचे समाज माध्यमांमधून समोर येत आहे. याची निश्पक्षपाती पद्धतीने चौकशी करून रुपाली चाकणकर यांचीही या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी जनवादी महिला संघटना व बीड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून शुक्रवारी धारूर तहसील समोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ऑड. अजय बुरांडे यांच्यासह कॉ. अशोक थोरात, जनवादी महिला संघटनेच्या कॉ. मीराताई शिंदे, काशीराम सिरसाट, संजय चोले, कॉ. लता खोपकर, दादासाहेब सिरसाट, बालासाहेब चोले, धनविर तांबोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Allegations of superstition or abuse of power womens commission embroiled in controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
1

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार
2

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत
3

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.