फोटो सौजन्य सोशल मिडिया
मागिल वर्षी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले; यंदा पुन्हा पावसा अभावी दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील सेतकऱ्यांना करावा लागत असून शेतकऱ्यांना; शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अश्या गंभिर सम्यांना सामोरे जावे लागत आहेत. बीड जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाई वाढल्याने ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.अशी परिस्थिती ग्रामस्तावर आली आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावातील नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, जलसंधारणाची कामे तसेच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मागणी आता ग्रामस्त करत आहेत.
रोजगार हमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेतली तर बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळेल आणि दुसरीकडे भविष्यातील पाणीटंचाई देखील कमी होईल.शासनाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी होणे; तसेच पंचनामे आणि विविध उपाययोजनांची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहचेल याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि पशुपालकांना तातडीने आवश्यक मदत देतानाच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी कायमस्वरूपी जलसंधारणाची कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.एकीकडे शेतीचे नुकसान, दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि त्यातच वाढत चाललेली पाणीटंचाई यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.






